शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जंगल आगीस वनरक्षक, वनपालांना जबाबदार धरणार

By admin | Updated: February 4, 2016 01:29 IST

वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे,

पी. कल्याणकुमार यांचा इशारा : आलापल्लीत आढावा बैठकआलापल्ली : वनक्षेत्रात कोणत्याही इसमाकडून बेकायदेशीरीत्या वणवा लावणे, जंगलाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रयत्न करावे, ज्या गावालगत जंगल क्षेत्रात आग लागल्यास त्या क्षेत्रात कार्यरत वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी यांना जबाबदार गृहीत धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार, असा इशारा गडचिरोलीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिला.आलापल्ली वन विभागाच्या सभागृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भामरागडचे उपवनसंरक्षक बाला, आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना तसेच आलापल्ली वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी क्षेत्र सहाय्यक आदी उपस्थित होते. यावेळी पी. कल्याणकुमार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या क्षेत्रात नरेगाची कामे अपूर्ण आहेत, त्यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण करून विहीत वेळेत निधी खर्च करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली. वन विभागामार्फत सुरू असलेली विकास कामे व निधी खर्चात वनपरिक्षेत्राधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास आपण खपवून घेणार नाही, प्रसंगी कारवाई करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)निस्तार कुपातून रोजगार द्यावनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निस्तार कुपाच्या बाबत स्थानिक नागरिकांमध्ये चुकीच्या गैरसमजुती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांचे प्रबोधन करावे, निस्तार कुपाच्या माध्यमातून वन विभाग स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकते, हे पटवून देण्याची गरज आहे. एक निस्तार कूप सरासरी ५ ते २० कोटी रूपयापर्यंतचा रोजगार स्थानिकांना देऊ शकते. एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्याच्या विचार केल्यास वर्षाला १०० कोटी रूपयांचे वार्षिक उत्पन्न वन विभाग निर्माण करू शकते. यातून प्रत्येक कुटुंबाला ५ ते २० हजार रूपयांचे वार्षिक उत्पन्न उपलब्ध करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.