शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तालुक्यातील फरी परिसरात फुलल्या भाजीपाल्याच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:21 IST

पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यातही लागवड : दरवर्षी भाजीपाला क्षेत्रात होत आहे वाढ; नगदी पिकांकडे शेतकºयांचा ओढा, इतरांसाठी प्रेरणादायी

अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गावाच्या सभोवताल आता धानाच्या शेतीऐवजी भाजीपाल्याचा बागा दिसायला सुरुवात झाली आहे. फरी येथील शेतकºयांनी निवडलेली ही नवीन वाट इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस धानाची शेती आतबट्ट्याचा उद्योग ठरत चालला आहे. मात्र जोखीम उठविण्याची तयारी शेतकºयांमध्ये नसल्याने अनेक शेतकरी अजूनही धानपिकाचीच शेती करीत आहेत. मात्र फरी-झरी गावातील नागरिकांनी धानाच्या शेतीला रामराम ठोकत भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे फरी-झरी परिसरात यापूर्वी हिवाळा व उन्हाळ्यातच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र आता पावसाळ्यातही भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. फरी-झरी गावाबरोबरच अरततोंडी, मोहटोला, किन्हाळा गावातीलही शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. फरी-झरी गावात १५ ते २० शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. दिनेश मोहुर्ले या शेतकºयाने दोन एकरात भाजीपाल्याची बाग फुलविली आहे. वांगी, कारले, लवकी, दोडका, मिरची, काकडी, टमाटर, चवळीच्या शेंगा आदी पिकांची लागवड केली आहे. दोन एकरातून किमान दोन लाख रूपयांचे उत्पादन होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोेलताना दिली आहे. बंगाली समाजाचे शेतकरी यापूर्वी भाजीपाल्याची लागवड करीत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतरही शेतकºयांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची बोंब होत असतानाच या गावातील शेतकºयांनी मात्र शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली आहे. इतर शेतकºयांसाठी सदर शेतकरी प्रेरणादायी ठरत आहेत.यंदा स्थानिक भाजीपालादेसाईगंजच्या आठवडी बाजारात यापूर्वी पावसाळ्यादरम्यान प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला येत होता. आता मात्र देसाईगंजच्या बाजारपेठेत तालुक्यातीलच भाजीपाला बघायला मिळतो. व्यापाºयांच्या तुलनेत शेतकºयाकडील भाजीपाला स्वस्तदरात मिळत असल्याने शेतकºयांकडील भाजीपाला घेण्यास अधिक पसंती दर्शवित आहेत.नगदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून भाजीपाल्याची लागवड करीत असताना कृषी विभागाचे त्यांना मार्गदर्शन लाभत नसल्याचे दिसून येत आहे.