शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा

By admin | Updated: June 18, 2016 00:51 IST

गावातील एका इसमासोबत भांडण करून काठीने जबर मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ...

न्यायालयाचा निर्णय : नोव्हेंबर २०१३ मध्ये घडली घटनागडचिरोली : गावातील एका इसमासोबत भांडण करून काठीने जबर मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी इसमास गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी भादंविचे कलम ३०४ भाग २ अन्वये पाच वर्षाची शिक्षा व १० हजार रूपयांचा दंड ठोठावला. मनोहर पत्रू टेकाम (४०) रा. राजगाटा माल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर मारोती बालाजी मेश्राम (३६) रा. राजगाटा माल असे मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. मृत्यू झालेल्या दिवशी मृतक मारोती मेश्राम यांच्या पत्नीने गडचिरोली पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मनोहर टेकाम याच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरिक्षक घनश्याम पलंगे यांनी सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपी मनोहर टेकाम याच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी आरोपी मनोहर टेकाम यास भादंविचे कलम ३०४ भाग २ अन्वये पाच वर्षाची शिक्षा तसेच १० हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. भादंविचे कलम ५०६ अन्वये सहा महिन्याची शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)असा घडला थरार३ नोव्हेंबर २०१३ रोजी मनोहर पत्रू टेकाम याने गावातीलच मारोती बालाजी मेश्राम याचेसोबत भांडण केले. त्यानंतर काठीने जबर मारहाण केली. यात मारोती मेश्राम हा गंभीर जखमी झाला. मारोती मेश्राम यांची मुलगी हिने सदर प्रकार पाहिला. त्यानंतर तिने घरात जाऊन या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मारोती मेश्राम यांची पत्नी घटनास्थळावर येऊन पाहणी केली असता, मनोहर टेकाम हा काठी घेऊन उभा होता. कशासाठी मारहाण केली, असे विचारणा केली असता, मनोहर टेकाम याने तिलाही मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मारोती मेश्राम यांची पत्नीने नातेवाईकाच्या सहकार्याने जखमी झालेले आपले पती मारोती मेश्राम यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ९ नोव्हेंबर २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला.