शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात पाचजण जखमी

By admin | Updated: July 17, 2015 01:33 IST

दोन वेगवेगळ्या अपघातात गुरूवारी पाचजण जखमी झाल्याची घटना आष्टी व आलापल्ली येथे घडली. दुचाकीला टाटा मॅजीक व ट्रकने धडक दिल्याने हे अपघात झालेत.

आष्टी, आलापल्लीत अपघात : दुचाकीला दिली धडक
आष्टी/आलापल्ली : दोन वेगवेगळ्या अपघातात गुरूवारी पाचजण जखमी झाल्याची घटना आष्टी व आलापल्ली येथे घडली. दुचाकीला टाटा मॅजीक व ट्रकने धडक दिल्याने हे अपघात झालेत.
आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाजवळ गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तीन युवक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सूर्यकांत आरके (२०) रा. किष्टापूर, सुरेंद्र शेडमाके (२३), विलास तलांडे (२५) दोघेही रा. मल्लेझरी अशी जखमींची नावे आहेत. चंद्रपूरवरून सिमेंटने भरलेला एमएच-२६-एच-५८६९ या क्रमांकाचा ट्रक आलापल्लीकडे जात होता. तर एमएच-३३-एच-१७७९ क्रमांकाच्या दुचाकीने युवक मल्लेझरीवरून आष्टीकडे येत होते. दरम्यान फुले महाविद्यालयाजवळ ट्रक व दुचाकी यांची जोरदार धडक झाली. या धडकेत तिन्ही युवकांना जबर मार लागला. यातील एकाचे दोन्ही पाय तुटले आहेत तर इतर दोघेसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.
अपघात होताच ट्रकचालकाने पोलीस स्टेशन गाठले. अपघातातील जखमींना महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक रवी शास्त्रकार व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तत्काळ वाहन बोलवून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मृणाल वाकुडकर, नागराज मेडपल्लीवार, चंद्रशेखर झाडे, शरद मडावी यांनी जखमींना मदत केली. याबद्दलची माहिती पोलिसांना दिल्यांनतर पोलीस कर्मचारी पोटवार व फुलझेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
तर दुसऱ्या एका अपघातात आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील राम मंदिराजवळ गुरूवारी १२.३० वाजताच्या सुमारास टाटा मॅजिक या वाहनाने दुचाकीला धडक दिली. चारचाकी वाहन चंद्रपूरवरून आलापल्लीच्या दिशेने येत होते. तर त्याच दिशेने जाणाऱ्या शंकर पाणेम (४०) हे जखमी झाले. त्यानंतर त्याच वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीलाही धडक दिली. या दुचाकीवर बसलेली महिलासुद्धा जखमी झाली. सदर महिलेचे नाव कळू शकले नाही. शंकर पाणेम व त्या महिलेला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (प्रतिनिधी)