शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह पाच लाखांची दारू जप्त

By admin | Updated: October 19, 2016 02:24 IST

दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीच्या

पुराडा-रामगड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगडचिरोली : दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी व रविवारी पुराडा-रामगड मार्गावर तसेच कसनसूर येथे सापळा रचून एका दारूविक्रेत्या आरोपीकडून चारचाकी वाहनासह पाच लाखांची दारू जप्त केली.शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उतपादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसनसूर येथील सुरेश नितलाल दास याच्या घरी धाड टाकून छत्तीसगडनिर्मित गोल्डन गोवा ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १ हजार २४८ बॉटल्स जप्त करण्यात आल्या. सदर दारूची किंमत १ लाख २४ हजार ८०० रूपये आहे. १६ आॅक्टोबर रोजी रविवारला पुराडा-रामगड मार्गवर सापळा रचला. दरम्यान सायंकाळच्या सुमारास एमएच-३३-ए-६०७ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. सदर वाहनाला अडवून झडती घेतली असता, त्यात छत्तीसगड निर्मिती गोवा विस्की ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १२ पेट्या आढळून आल्या. या दारूची किंमत ५७ हजार ६०० रूपये आहे. तसेच १८० मिलीमापाच्या इप्लेरियल ब्ल्यू ब्रँडच्या तीन पेट्या विदेशी दारू जप्त करण्यात आल्या. याची किंमत २८ हजार ८०० रूपये आहे. २१ हजार ६०० रूपये किंमतीची मध्यप्रदेश निर्मित किंग फिशर बिअरच्या ९ पेट्या जप्त करण्यात आल्या. वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाहनासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५ लाख ३२ हजार ८०० रूपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख करीत आहेत. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडचिरोलीचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख, जी. पी. गजभिये, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एम. गव्हारे तसेच व्ही. पी. शेंद्रे, व्ही. पी. महाकुमलकर आदींनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)