पाच तासात चोरीच्या वाहनाचा छडा

By Admin | Updated: September 3, 2016 01:31 IST2016-09-03T01:31:40+5:302016-09-03T01:31:40+5:30

दुचाकी वाहन चोरी झाल्याची तोंडी तक्रार वाहन मालकाने केल्यानंतर अहेरी ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी

In five hours the stick of theft vehicle | पाच तासात चोरीच्या वाहनाचा छडा

पाच तासात चोरीच्या वाहनाचा छडा

आलापल्लीतील घटना : गोपनीय यंत्रणा लावली कामाला
आलापल्ली : दुचाकी वाहन चोरी झाल्याची तोंडी तक्रार वाहन मालकाने केल्यानंतर अहेरी ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी गोपनिय यंत्रणा कामाला लावून अवघ्या पाच तासात वाहन शोधून काढले. मंथनवार यांच्या या कार्याची आलापल्लीवासीयांनी व ठाण्यातील इतर सहकाऱ्यांनीही कौतूक केले आहे.
वनरक्षक रामचंद्र राठोड यांची दुचाकी १ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबतची माहिती राठोड यांनी पोलीस हवालदार मंथनवार यांना तोंडी दिली. राठोड यांच्या पोलीस तक्रारीची वाट न बघता पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात संतोष मंथनवार यांनी आपली गोपनिय यंत्रणा कामाला लावली असता, दुचाकी चोरटे हे सिरोंचा मार्गावर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच त्यांचा पाठलाग केला असता, मलमपल्ली गावाजवळ दुचाकी रस्त्यावरच सोडून दोन्ही चोरट्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. सदर वाहन वनरक्षक राठोड यांना बोलावून त्यांना परत करण्यात आले. आरोपींचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In five hours the stick of theft vehicle