मृतक पोलीस हवालदाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST2021-03-10T04:36:47+5:302021-03-10T04:36:47+5:30

पोलीस हवालदार कोपा परसा हे विशेष अभियान पथक अहेरीत कार्यरत हाेते. दरम्यान, आजाराने २ मार्च २०२१ राेजी त्यांच्या राहत्या ...

Financial assistance to the family of the deceased police constable | मृतक पोलीस हवालदाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

मृतक पोलीस हवालदाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

पोलीस हवालदार कोपा परसा हे विशेष अभियान पथक अहेरीत कार्यरत हाेते. दरम्यान, आजाराने २ मार्च २०२१ राेजी त्यांच्या राहत्या गावी भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील हिद्दूर या गावात निधन झाले. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा असे कुटुंब आहे. त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष मंथनवार व मृतक कोपा परसा यांचे १८९८ च्या बॅचचे सर्व पोलीस अंमलदारांना मिळाली. संतोष मंथनवार यांनी पुढाकार घेऊन सर्व बॅचचे कर्मचारी मिळून चोपन्न हजार पाचशे एक रुपये जमा केले. मृतक कोपा परसा यांची पत्नी संगीता कोपा परसा यांना अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांचे हस्ते चोपन्न हजार पाचशे एक रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी पार्टी कमांडर मधुकर रत्नम, शमशेर पठाण, शंकर अरवेलीवार, अनिल वरखडे, व्यंकटेश येल्लला, सुमन गर्गम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Financial assistance to the family of the deceased police constable