अखेर न.प. शाळेची जीर्ण इमारत पाडली

By Admin | Updated: September 9, 2014 23:28 IST2014-09-09T23:28:32+5:302014-09-09T23:28:32+5:30

आरमोरी मार्गावरील नगरपरीषद शाळेची जीर्ण झालेली इमारत अखेर पाडण्यात आली़ पावसामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्यासाठी

Finally NP The school's dilapidated building was destroyed | अखेर न.प. शाळेची जीर्ण इमारत पाडली

अखेर न.प. शाळेची जीर्ण इमारत पाडली

न.प. प्रशासनाची कारवाई : पावसामुळे भिंत कोसळून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती
देसाईगंज : आरमोरी मार्गावरील नगरपरीषद शाळेची जीर्ण झालेली इमारत अखेर पाडण्यात आली़ पावसामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी कित्येक दिवसांपासून प्रयत्न चालविले होते़ मात्र इमारतीची एक भिंत पूर्णपणे पडल्यावर नगर पालिका प्रशासनाला नाईलाजाने जीर्ण झालेली इमारत पाडावी लागली़
शहरातील आरमोरी मार्गावर १९५३ पासून नगर पालिका प्रशासनाच्या शाळेची इमारत उभी आहे़ पूर्वीच्या काळी या इमारतीने शहरात वेगळी ओळख निर्माण केली होती़ पूर्वीच्या जिल्हा परिषद विभागाने ही इमारत बांधलेली होती़ नगर पालिका स्थापन झाल्यानंतर ही इमारत पालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली़ नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे ही इमारत मोडकडीस आली होती़ इमारतीच्या आजूबाजूला दाटीने लहान व्यापाऱ्यांची दुकाने आहेत़ इमारतीचा एक भाग पूर्णपणे पडलेला होता़ त्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्याकरीता शेजारच्या व्यापाऱ्यांनी अनेकदा नगर पालिका प्रशासनाकडे अर्ज केले होते़ मात्र नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते़ सतत येत असलेल्या पावसामुळे सोमवारी दुपारी इमारतीची दुसरीही भिंत पूर्णपणे जमिनदोस्त झाली़ जीर्ण झालेली इमारत पडण्याचा धोका अधिक गडद झाला़ या सबंधाने व्यापाऱ्यांनी लगेच नगर पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली़ मात्र प्रत्यक्ष जागेवरचा धोका लक्षात न घेता नगर पालिका प्रशासन चालढकल करण्याचे उत्तरे देत होते. लगेच पोलीस निरीक्षक मांजरे यांना याबाबतची माहिती देण्यात आली़ पोलीस प्रशासनाने लगेच नगर पालिका प्रशासनाला बोलावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या़ मंगळवारी इमारत पाडण्याची कार्यवाही केली. (वार्ताहर)

Web Title: Finally NP The school's dilapidated building was destroyed