धान व साेनेचांदी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:14+5:302021-01-08T05:58:14+5:30

गडचिराेली : वैधमापन शास्त्र गडचिराेलीच्या पथकाने ग्रामीण भागातील धान व्यापारी व साेनेचांदी व्यापारी यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली. प्रत्येक एका ...

Filed a case against a grain and silver trader | धान व साेनेचांदी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

धान व साेनेचांदी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

गडचिराेली : वैधमापन शास्त्र गडचिराेलीच्या पथकाने ग्रामीण भागातील धान व्यापारी व साेनेचांदी व्यापारी यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली. प्रत्येक एका धान व साेनेचांदी व्यापाऱ्याने वजनकाट्याची पडताळणी व मूल्यांकन केले नसल्याचे आढळून आल्याने दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैधमापन शास्त्र विभागाने वजनकाट्यांची तपासणी माेहीम हाती घेतली आहे. या विभागाच्या पथकाने तालुक्यातील पाेर्ला, काटली येथील १० धान व्यापारी व साेनेचांदी व्यापारी यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली. एका धान खरेदी व साेनेचांदी व्यापाऱ्याने वजनकाट्यांची पडताळणी व मूल्यांकन केले नसल्याचे आढळून आले. त्यांच्याविराेधात महाराष्ट्र वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक रूपचंद फुलझेले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.

Web Title: Filed a case against a grain and silver trader