Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

Commercial Gas Cylinder Price Hike: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग संकटात सापडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:50 IST2026-05-02T09:48:01+5:302026-05-02T09:50:14+5:30

Commercial Gas Cylinder Price Hike: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग संकटात सापडला आहे.

Commercial LPG price hike hits hotel industry hard Food prices likely to increase by up to 15 percent | कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

Commercial Gas Cylinder Price Hike: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग संकटात सापडला आहे. कमर्शियल एलपीजीच्या किमतीतील या ताज्या वाढीमुळे हॉटेल उद्योगाला 'गंभीर झटका' बसला असून पुढील काळात परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

उद्योग संघटनांनी सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. १ मे २०२६ पासून कमर्शियल एलपीजीच्या किमतीत ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता १९ किलोच्या सिलेंडरचा दर विक्रमी ३,०७१.५० रुपये झाला आहे.

यापूर्वीही वाढवण्यात आलेले दर

यापूर्वी एप्रिलमध्ये कमर्शियल एलपीजीच्या किमती १९५.५० रुपयांनी आणि मार्चमध्ये १४४ रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (FHRAI) उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी, एलपीजीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जेवणाच्या दरात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होणं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं. परंतु ही दरवाढदेखील वाढलेल्या खर्चाची पूर्ण भरपाई करू शकणार नाही, असंही ते म्हणाले. १९ किलोच्या सिलिंडरमध्ये तीन वेळा मिळून झालेल्या एकूण १,३३२.५० रुपयांच्या दरवाढीमुळे उद्योगाचा परिचालन खर्च अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे. हे संकट अशा वेळी आलंय जेव्हा व्यवसाय आधीच पुरवठ्यातील व्यत्यय, मर्यादित परिचालन क्षमता आणि कमकुवत रोख प्रवाह यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहेत.

'मार्जिनवर येऊ शकतो दबाव'

प्रदीप शेट्टी यांच्या मते अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट आधीच मर्यादित वेळ, मर्यादित मेन्यू आणि पर्यायी इंधन व्यवस्थेसह काम करत आहेत. अशा परिस्थितीत, ९९३ रुपयांच्या या वाढीमुळे त्यांच्या मार्जिनवर दबाव येईल आणि कामकाजावर त्याचा परिणाम होईल. त्यांनी असा इशारा दिला आहे की अनेक हॉटेल-रेस्टॉरंट आधीच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाली असून किमतीतील ही नवीन वाढ हॉटेल-रेस्टॉरंट बंद होणं आणि रोजगार कपातीला अधिक वेग देऊ शकते.

Web Title : एलपीजी की कीमतों में वृद्धि से होटल व्यवसाय प्रभावित; खाद्य पदार्थों के दाम बढ़ेंगे

Web Summary : एलपीजी की कीमतों में वृद्धि से होटल व्यवसाय संकट में। आपूर्ति बाधित होने से लागत 15% तक बढ़ने की आशंका है। उद्योग ने सरकार से हस्तक्षेप करने का आग्रह किया है, जिससे कारोबार बंद होने और नौकरी छूटने का डर है।

Web Title : LPG Price Hike Hits Hotels; Food Costs Likely to Rise

Web Summary : Commercial LPG price surge threatens hotel industry due to disrupted supply. Costs may rise 15%, further straining businesses already facing operational challenges. Industry urges government intervention to reverse the hike, fearing closures and job losses.