गुड्डीगुडममध्ये भावाविरुद्ध भाऊ तर गेवर्धात आतेभाऊ-मामेभावात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:51+5:302021-01-13T05:36:51+5:30

पहिल्या टप्प्यातील कुरखेडा आणि अहेरी तालुक्यात दोन गावांमध्ये नातेवाइकांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम ...

Fighting against brother in Guddigudam and brother-in-law in Gevardha | गुड्डीगुडममध्ये भावाविरुद्ध भाऊ तर गेवर्धात आतेभाऊ-मामेभावात लढत

गुड्डीगुडममध्ये भावाविरुद्ध भाऊ तर गेवर्धात आतेभाऊ-मामेभावात लढत

पहिल्या टप्प्यातील कुरखेडा आणि अहेरी तालुक्यात दोन गावांमध्ये नातेवाइकांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथील दोन भावांमधील लढत चर्चेचा विषय झाली आहे. त्यांच्यासाठी प्रचार करताना नातेवाईकही दोन गटांत विभागले गेले आहेत. पण, काही नातेवाइकांनी दोन्हीही उमेदवार जवळचे, असे म्हणत कोणत्याली एका उमेदवाराला समर्थन देण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

पहिल्या टप्प्यासाठी दि. १५ ला मतदान होणार आहे. जिल्ह्यात मतदानाची वेळ दुपारी ३ पर्यंत असल्यामुळे दि. १३ ला दुपारी ३ वाजेपर्यंत प्रचाराच्या जाहीर सभा घेता येतील. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी मात्र हे बंधन राहणार नाही. मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच चुरस असली तरी दुर्गम भागातील ग्रामपंचायतींमध्ये प्रचारही थंड असल्याचे निवडणूक यंत्रणा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेंदाम परिवार मैदानात

अहेरी तालुक्यात गुड्डीगुडम येथील माेठे भाऊ रमाकांत अशाेक पेंदाम व लहान श्रीकांत अशाेक पेंदाम हे एकमेकांविराेधात प्रभाग क्र. २ मधून निवडणूक लढवित आहेत. रमाकांत हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर श्रीकांत हे नागुलवार गटाकडून रिंगणात आहेत. गुड्डीगुडम गावात पेंदाम हा सर्वांत माेठा परिवार आहे.

मित्र-नातेवाईकही लढतीत

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा गट ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. ३ मध्ये दाेन आतेभाऊ-मामेभाऊ समाेरासमाेर उभे ठाकले आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य राेशन सय्यद यांच्या विराेधात त्यांचे मामेभाऊ ताहीर शेख यांनी नामांकन दाखल केले आहे. सय्यद यांचे जवळचे मित्र माजी उपसरपंच संदीप नखाते हेसुद्धा लढतीत आहेत. या ठिकाणी मित्र व दाेन मेहुणे असा सामना आहे.

माेहटाेलात एकाच घराण्यातील भाऊ एकमेकांविराेधात

देसाईगंज तालुक्यातील माेहटाेला येथील अनिल दाेनाडकर व सुरेश दाेनाडकर हे एकमेकांविराेधात प्रभाग क्र. ३ मधून निवडणूक लढवित आहेत. दाेन भाऊ एकमेकांविराेधात उभे ठाकल्याने लढतीची रंगत आणखी वाढली आहे. दाेघेही प्रचाराला भिडले आहेत. त्यामुळे नेमके कुणाला मतदान करावे, असा प्रश्न प्रभागातील मतदारांसमाेर निर्माण झाला आहे. सर्वांना या निकालाची उत्सुकता राहणार आहे.

Web Title: Fighting against brother in Guddigudam and brother-in-law in Gevardha