कारागृहात होणार आधुनिक पध्दतीने शेती

By Admin | Updated: August 28, 2016 01:35 IST2016-08-28T01:35:02+5:302016-08-28T01:35:02+5:30

राज्यातील कारागृहांमधील शेती आधुनिक पध्दतीने कसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Farming will be going on in a modern way | कारागृहात होणार आधुनिक पध्दतीने शेती

कारागृहात होणार आधुनिक पध्दतीने शेती

उत्पन्न वाढीस मदत : ट्रॅक्टर खरेदीसाठी गडचिरोली कारागृहाला सहा लाखांचा निधी मंजूर
गडचिरोली : राज्यातील कारागृहांमधील शेती आधुनिक पध्दतीने कसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यभरातील नऊ कारागृहांसाठी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी ६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
कारागृहातील बहुतांश कैद्यांना न्यायालयाकडून सश्रम कारावास सुनावला जातो. एकाच बॅरेकमध्ये दिवसभर राहण्यामुळे कैद्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे या कैद्यांकडून त्यांना जमेल ते काम करवून घेतले जाते. बहुतांश कारागृहांमध्ये शेती कसल्या जाते. मात्र शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने पारंपरिकरितीने शेती कसावी लागत होती. त्यामुळे कधीकधी खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी होत होते. त्यामुळे कारागृहांना शेती उपयोगी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, विसापूर खुले कारागृह, पैठण खुले कारागृह, धुळे, नाशिक, नंदूरबार, वाशिम येथीलही कारागृहांना निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहात ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहातील बहुतांश कैदी शेतीच कसत असल्याने येथील कैद्यांसाठी सोयीचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farming will be going on in a modern way