शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतरही जलसाठे कोरडेठाकच

By admin | Updated: July 19, 2015 01:47 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई : दमट वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : पावसाळ्याला सुरूवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे व जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. त्याचप्रमाणे यावर्षीही दुसऱ्या आठवड्यात तब्बल चार दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारली आहे. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी पहिल्या पावसामुळे तलाव, नदी, नाले यांच्यामध्ये साचलेले पाणी पूर्णपणे आटले आहे. उन्हाळ्याप्रमाणेच हे सर्व जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ४८२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद सरकारदप्तरी करण्यात आली आहे. एकूण पावसाच्या हे प्रमाण २५ टक्के असल्याने सर्व आलबेल असल्याची नोंद सरकार दप्तरी झाली आहे. मात्र प्रत्यक्षात हा पाऊस केवळ चार दिवसांचा असून त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे संपूर्ण खरीप पिके धोक्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबारपेरणीलाही सुरूवात केली आहे. रोवणींचे कामे पूर्णपणे ठप्प पडली असून शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
डिझेल इंजिनने पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न
भामरागड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेताजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी डिझेल इंजिन, विद्युत मोटारपंपाचा वापर करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात डिझेल इंजिनचा वापर केला जात असल्याचे चित्र भामरागड तालुक्यात बघायला मिळत आहे.
पावसासाठी आरमोरीत देवाला साकडे
जिल्ह्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी आरमोरी शहरातील बर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील महादेव मंदिर, दत्तमंदिर, हनुमान मंदिर व माता मंदिरात जाऊन देवीदेवतांची पूजा-अर्चा केली. त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून देवाला साकडे घातले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते नंदू मने, किशोर गोंदोळे, सुनिल ठाकरे, बापू तिजारे, रमेश ठाकरे, आनंद कामडे, सुभाष धोटे, बंडू गायकवाड, भाग्यवान चोपकर, गणेश ठाकरे, मंगेश सोनकुसरे, गोपाल ठाकरे, घनशाम ठाकरे, बुधा नंदनवार, पांडुरंग ठाकरे, किसन ठाकरे, पांडुरंग सोरते, गीताबाई ठाकरे, विमल ठाकरे, प्रेमिला ठाकरे, बंडू मेश्राम, प्रभू माकडे, दिवाकर गरमडे, तुलाराम कामडे, अमर धार्मिक, परमेश्वर ठाकरे, रवी ठाकरे, विश्वनाथ दुमाने यांच्यासह आरमोरीतील अनेक भाविक सहभागी झाले होते.