शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

२४ दिवसानंतरही भामरागडातील कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीतच

By admin | Updated: July 15, 2015 01:44 IST

तालुक्यात १८ जूनच्या रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.

भामरागड : तालुक्यात १८ जूनच्या रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या व संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रमानंतर आठ दिवसांत भामरागडचा वीज पुरवठा सुरळीत केला. परंतु २४ दिवसांचा कालावधी उलटूनही प्रकल्प कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती आदीमधील वीज पुरवठा खंडीतच आहे. त्यामुळे या कार्यालयातील शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. जनरेटर लावून हे काम सुरू करण्यात आले आहे.
२० जूनला पूर ओसरला. तातडीने वीज दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडे हे काम सोपवून स्वत: मोकळे झाले आहे. परंतु कंत्राटदार आला नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांनीच रात्रंदिवस परिश्रम करून आठ दिवसानंतर भामरागड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व भामरागड गावातील वीज पुरवठा सुरू केला. कोठी, लाहेरी, नारगुंडा, धोडराज परिसरातील वीज दुरूस्तीच्या कामासाठी ठेकेदार आले नाही. अखेरीस संतापलेल्या लाहेरी परिसरातील १०० नागरिकांनी भामरागडात पोहोचून आपली आपबिती सांगितली. रात्री संकटाचा कसा सामना करावा लागतो, हे ही सांगितले. त्यानंतर दोन दिवसाने लाहेरीचा वीज पुरवठा सुरू झाला. भामरागड येथील अभियंत्याकडे अत्यंत कमी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. दुरूस्ती पथकाचे सामान नेण्यासाठी वाहनही नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना दुर्गम गावांपर्यंत पोहोचताना अडचण निर्माण होत आहे. सोमवारपर्यंत कोठी, नारगुंडा परिसर अंधारातच होता. २० दिवस उलटूनही येथे वीज पुरवठा सुरू झाला नाही तर भामरागडातील प्रमुख शासकीय कार्यालयात २४ दिवसानंतरही वीज आली नाही. त्यामुळे यामध्ये आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, आयटीआय, पंचायत समिती कार्यालय यांचा समावेश आहे. तालुक्यात वादळी पावसामुळे महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आणखी किती दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागेल, याविषयी शांसकताच आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनाही आढावा बैठकीत याची माहिती देण्यात आली व तालुक्यातील महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे व कार्यालयाला पथकाचे वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु पालकमंत्र्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)