बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागा

By Admin | Updated: May 8, 2016 01:23 IST2016-05-08T01:23:22+5:302016-05-08T01:23:22+5:30

आगामी नगर पालिका निवडणुकीसंबंधाने कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्ज व्हावे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी तसेच निवडणुकीत

Establish the Booth Committee | बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागा

बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागा

सुरेश पोरेड्डीवार : राकाँची आढावा बैठक
गडचिरोली : आगामी नगर पालिका निवडणुकीसंबंधाने कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्ज व्हावे, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी तसेच निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी वॉर्डनिहाय बुथ कमिटी स्थापन करून कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी शनिवारी पक्ष कार्यालयात आयोजित राकाँ कार्यकत्यांच्या आढावा बैठकीत केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वॉर्ड अध्यक्ष व शहर कार्यकारिणीची आढावा सभा पक्ष कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सेलचे डॉ. हेमंत अप्पलवार, राकाँ जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर, सोनाली पुण्यपवार, तुकाराम पुरणवार, रिंकू पापडकर, नंदलाल लाडे, नकटू पेटकर, अरूण हरडे, नितीन खोब्रागडे, मनीषा खेवले, विजय कावडे, दिलीप धात्रक, अमिन जीवानी, रफिक शेख, पुंडलिक चौधरी, हरिदास गेडाम, रवी किरमिरवार, श्रीनिवास गोडसेलवार, वासुदेव मोहुर्ले, मुरलीधर शंकरवार, भाष्कर रच्चावार, इस्राईल शेख, उमाजी गेडाम, अविनाश कुनघाडकर, विजय धकाते, बंडू वाढई, दुर्याेधन रायपुरे, अंकुश कोतपल्लीवार, रमेश टेकाम, स्वप्नील मोटघरे, ज्ञानदेव नैताम, प्रफुल चापले, नरेंद्र बोडाले, प्रवीण देशमुख, नागेश अभारे, अमित चांदेकर, नितीन वडेट्टीवार, अतुल तुम्पल्लीवार, कथले, आकाश पगाडे, बानबले, चन्नावार, वैरागडे, उंदीरवाडे हजर होते. आभार वाढई यांनी मानले.

Web Title: Establish the Booth Committee