शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवंर्धन प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

गडचिरोली: भाैतिक प्रगती करताना पर्यावरण व वसुंधरेची हानी हाेणार नाही. याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...

गडचिरोली: भाैतिक प्रगती करताना पर्यावरण व वसुंधरेची हानी हाेणार नाही. याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी शपथ देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्र्यानी ऑनलाईन मार्गदर्शन केले. जिल्हयात नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह जिल्हाधिकारी कार्यालयात हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद , निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपादेे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, कल्पना निळ व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, हे अभियान वातावरणीय बदलांमूळे झालेले नुकसान भरुन काढण्यास मदत करेल. वातावरणीय बदल हे देशापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला त्याने ग्रासले आहे. आपण भौतिक प्रगती साधत असताना आपल्या वसुंधरेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. निसर्गाकडून घेत असताना त्याला आपण देणेही लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि याच आधारावर माझी वसुंधरा अभियानाची आखणी करण्यात आली आहे. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोक एकत्र आले पाहिजेत. अभियान ही लोकचळवळ उभी करण्यासाठीचा एक मार्ग आहे. परंतु ही चळवळ शासनाच्या किंवा सरकारपूरती मर्यादित राहता कामा नये. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले.