१४ वर्षांनंतर उघडले मंदिराचे द्वार

By Admin | Updated: August 26, 2016 01:14 IST2016-08-26T01:14:38+5:302016-08-26T01:14:38+5:30

गावाशेजारी असलेल्या जुन्या पडक्या हनुमान मंदिराचे नव्याने बांधकाम १९९४ मध्ये सुकाळा येथील ग्रामस्थांनी केले होते.

The entrance to the temple opened after 14 years | १४ वर्षांनंतर उघडले मंदिराचे द्वार

१४ वर्षांनंतर उघडले मंदिराचे द्वार

सुकाळा येथील घटना : भगवान हनुमानाला केले होते बंदिस्त
वैरागड : गावाशेजारी असलेल्या जुन्या पडक्या हनुमान मंदिराचे नव्याने बांधकाम १९९४ मध्ये सुकाळा येथील ग्रामस्थांनी केले होते. परंतु शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुकाळा येथील नागरिक बाबुराव नीलकंठ राऊत यांनी मंदिरावर आणि मंदिर परिसरातील जागेवर आपला हक्क सांगितला आणि २०१३ मध्ये बेकायदेशीररित्या गाव नमुना- ८ मध्ये नोंदणी करून सार्वजनिक मंदिरातील मूर्तीला बंदिस्त करून ठेवले. सलग १४ वर्षे मंदिर दुर्लक्षित राहिल्यानंतर मंगळवार २३ आॅगस्ट रोजी मंदिर गावकऱ्यांच्या पुढाकाराने दर्शनासाठी खुले करण्यात आले.
पुराना वैैरागड म्हणून महसूल दप्तरी सुकाळाची नोंद आहे. गाव वेगळे झाल्यानंतर येथे जुनाट हनुमानाचे मंदिर होते. सगळे ग्रामस्थ या मंदिरात पूजाअर्चा करायचे. काकड आरती, कार्तिक पौर्णिमेचा काला या ठिकाणी होत असे. परंतु त्यानंतर बाबुराव नीलकंठ राऊत यांनी मंदिरावर व मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर आपली मालकी सांगितली आणि देवालाच बंदिस्त केले. इतकेच नव्हे तर राऊत कुटुंबीयांकडून या मंदिरातील मूर्त्यांची विटंबना करण्यात आली. धानाचे पोते व इतर वस्तू ठेवण्यासाठी मंदिराचा वापर केला. सुकाळावासीयांनी याबाबत आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून शेवटी ठाणेदार पाटील यांच्या मध्यस्थीने मंगळवारी मंदिरात पूजाअर्चा करून सरपंच प्रतिभा नैैताम यांनी मंदिराचे दरवाजे खुले केले. यावेळी जि. प. सदस्य लक्ष्मी मने, राजू अंबानी, उपसरपंच किशोर वाटगुरे, तंमुस अध्यक्ष भारत भैसारे, दयाराम मडावी, रामदास वाटगुरे, बालाजी मोहुर्ले, निंबाजी सोनटक्के, गुलाब सांगोळकर, सत्यवान कुमरे, जगन मेश्राम, मोतिराम कोल्हे, हरेष इन्कणे, मोतिराम गुरनुले, लोमेश्वर पेंदाम, सुशीला आत्राम, सिंधू आत्राम, कमल कोल्हे, कांता भोयर, लक्ष्मी इन्कणे, यशोदा मडावी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The entrance to the temple opened after 14 years