वडधातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

By Admin | Updated: May 30, 2015 02:02 IST2015-05-30T02:02:10+5:302015-05-30T02:02:10+5:30

तालुक्यातील वडधा येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मार्ग अरूंद झाला असून अपघाताची शक्यता बळावली आहे.

Encroachment on the main road in Wadhda | वडधातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

वडधातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मार्ग अरूंद झाला असून अपघाताची शक्यता बळावली आहे.
वडधा येथील मुख्य चौक असलेल्या पोर्ला ते रांगी व देशपूर ते डार्ली या मार्गांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. काही दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभारले असून हे शेड नालीच्या पलीकडे रस्त्यावर आले आहेत. टॅक्सी वाहतूकदारही त्यांचे वाहन रस्त्यावरच ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना या रस्त्यावरून मार्गच राहत नाही. या चौकामध्ये आजपर्यंत किरकोळ अपघातही झाले आहे. मुख्य मार्गावर प्रवासी निवारा उभारला आहे. मात्र या प्रवासी निवाऱ्याच्या सभोवताल अतिक्रमण झाल्याने हा प्रवाशी निवारा दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशी या निवाऱ्यात न थांबता बाहेरच थांबून बसची वाट पाहणे पसंत करीत असल्याचे चित्र दिसून येते.
वडधा ते डार्ली मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दररविवारी आठवडी बाजार भरते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. वाहनधारकांना या मार्गावरून वाहन नेताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. बाजारामुळे गावातील शेतकऱ्यांची जनावरे गावामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणावरून बाजार उठवून ग्राम पंचायतीने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य विवेक खेवले, दुर्वेश खेवले, रेवनाथ गंडाटे, रमेश चापले, प्रकाश देशमुख, मधुकर भजबुजे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Encroachment on the main road in Wadhda