शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाडीमुळे महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटवून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून असे घडत आहे. अंबाडीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून तयार होणारे पदार्थ, त्याचा उपयोग आणि बाजारपेठेची उपलब्धता याची माहिती घेऊन ती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे.

ठळक मुद्देबेलगावच्या महिला सरसावल्या : क्रांती ग्राम संघाच्या महिलांनी सुरू केला व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि उमेद अभियानाच्या मदतीने बेलगाव/ खैरी येथील क्रांती ग्राम संघाच्या महिलांनी अंबाडीपासून विविध खाद्य पदार्थ निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल केली आहे.ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटवून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून असे घडत आहे. अंबाडीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून तयार होणारे पदार्थ, त्याचा उपयोग आणि बाजारपेठेची उपलब्धता याची माहिती घेऊन ती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीला जोड पीक म्हणून अंबाडीची लागवड करीत आहेत. शेतीतून निघालेल्या पिकाला ग्राम संघाच्या महिलांनी अंबाडीच्या सुकलेले फुल ९० रूपये किलो तर बिया १० रूपये किलो याप्रमाणे विकत घेत आहेत. अंबाडी फुल आणि बियांपासून खाद्य पदार्थ मूल्यवर्धित करून व्यवसाय सुरू केला आहे. महिलांच्या या व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी बाहेर गावाहून अनेक लोक बेलगावाला भेट देत आहेत.आरोग्यदायी अंबाडीअंबाडीच्या फुलापासून पावडर, सरबत, जॅम, जिल्ली, लोणचे, चटणी आणि बियांपासून तेल, चटणी, बेसन तर पानांपासून लोणचे आणि भाजी बनविली जाते. अंबडीपासून बनविले जाणारे पदार्थ नुसते खाद्य पदार्थ नसून त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते, दृष्टी क्षमता वाढते. त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, पचन सुधारणे, हाडे मजबूत करणे, अभिसरण वाढविणे, रक्तदाब कमी करणे, भूक वाढविणे, मधुमेहापासून संरक्षण आदी फायदे आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारी