शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख मजुरांना मिळाला रोजगार

By admin | Updated: July 24, 2015 01:27 IST

१ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.

रोहयोची कामगिरी : १७ लाख ८१ हजार मनुष्यदिवस काम
गडचिरोली : १ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना सुमारे १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराची समस्या सुरुवातीपासूनच गंभीर आहे. शेतीच्या कालावधीत दोन महिने वगळता इतर कालावधीत रोजगारच मिळत नाही. रोजगार उपलब्ध नसल्याने याचा परिणाम उत्पन्नावर पडत होता. शहरातील शिकलेले तरूण रोजगारासाठी शहरात जात असले तरी निरक्षर व्यक्तीला रिकामे राहिल्याशिवाय पर्याय राहला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या प्रत्येक मजुराला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाच्या कालावधीत जून ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी वनवन भटकावे लागते. अशा नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अत्यंत मोलाची ठरली आहे. अनेक नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामाची आतुरतेने वाट बघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळते. आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून ते २२ जुलैपर्यंत सुमारे १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार देण्यात आला आहे. सर्वाधिक २ लाख ५८ हजार ६६६ मनुष्य दिवस रोजगार चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध झाला आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी दूर होण्यास फार मोठी मदत झाली आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती उपयोगी कामे केली जातात. विशेषकरून बंधारा, मजगीचे काम, बोडी दुरूस्ती, तलावाचे खोलीकरण, पांदण रस्ता आदी कामे केली जातात. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या शेतात मजगीची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत पडीत असलेल्या जमिनीत शेतकरी उत्पन्न घेऊ लागले आहेत. परिणामी रोहयोमुळे शेतकरी व मजूरही सुखी झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
१८ कोटी रूपये थकले
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असला तरी या योजनेचे पैसे मजुरांना वेळेवर मिळत नाही, हा या योजनेचा सर्वात मोठा दोष मानल्या जातो. काम झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांशिवाय कधीकधी सहा महिने उलटूनही मजुरी उपलब्ध होत नाही. रोजगार हमी योजनेच्या एकूण कामापैकी सुमारे २ कोटी १४ लाख रूपये प्राप्त झाले नाही. यामध्ये अकुशल कामगारांचे ८५ लाख ९३ हजार तर रोजगार हमी योजनेच्या कामासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यावरील १ कोटी २८ लाख ७७ हजार रूपयांचा समावेश आहे.