शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात हत्तीचां धुमाकूळ; कापणी व मळणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:44 IST

Gadchiroli : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त शेतांची पाहणी

प्रमोद मेश्राम गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील सतत हत्तीच्या धुमाकूळामुळे मक्का पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तीनीं संपूर्ण मक्का नष्ट केला आहे. याची माहिती मिळताच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी कुरंझा, देलोडा (बुज) व देशपुर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसान ग्रस्त सोलर पॅनल पंप  व पिकांची पाहणी केली. सदर नुकसानीचे रीतसर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना वन खात्यातील कर्मचाऱ्यांना दिल्या. 

परिसरात मक्का पिकाची लागवड शेतकरी करीत असतात. ऐन कापणी व मळणीला आलेल्या मक्कापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी  लागवड केलेली होती. परंतु हत्तीच्या धुमाकुळामुळे नुकसान होत असेल तर शेतात पिक कसे काढायचे व बँकेचे कर्जे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी काँग्रेस कडून अनेक आंदोलणे कारण्यांत आली परंतु शासन व प्रशासन याविषयी उदासीन दिसून येते. 

यावेळी  जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, जिल्हा उपाध्यक्ष कागज कमिटी गडचिरोली दिलीप घोडाम, ऋषीजी मानकर, मारुती तुमराम, किशोर जांभुळकर,  किशोर उपरीकर, दिलीप आत्राम, यादव जांभुळकर, पुरुषोत्तम मगरे, पराग जांभुळकर, किशोर मसाखेत्री, डस्टर जांभुळकर, सौ.शितलताई मानकर, सौ.मंगला नागापूरे, सौ.समताताई जांभूळकर, सौ.पूर्णाताई जांभुळकर, सौ. प्रीतीताई जांभुळकर, सागर जांभुळकर परिसरातील ग्रसित शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfarmingशेती