शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

छत्तीसगड सीमेनजीकच्या संवेदनशील परिसराला एकनाथ शिंदे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:24 AM

गडचिरोलीतील आदिवासी कुटुंबीयांची केली आस्थेने विचारपूस

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेनजीकच्या नक्षलग्रस्त संवेदनशील परिसराला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी रविवारी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ते दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. प्रथमच सरकारचा कोणी मंत्री संवाद साधण्यासाठी या परिसरात आल्यामुळे येथील आदिवासी बांधवांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून या संवेदनशील परिसराचा दौरा केला.

जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी दूर असलेल्या छत्तीसगडच्या सीमेवरील पातागुडम या गावी एकनाथ शिंदे रविवारी पोहोचले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या गावी वीज पोहोचली. ऐम कावाले (काय पाहिजे), मंचिगा उंदा (बरं आहे काय?) असे त्यांच्या भाषेत आस्थेने चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका मुलाने एसटीतील भरती निवड रखडल्याचा मुद्दा मांडला. तर शिंदे यांनी नक्षलपीडित दोन कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक सिंघला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.तसेच शिंदे यांनी सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाची पाहणी केली. तसेच पातागुडम पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफ व बीएसएफ जवानांच्या वसतिगृहाची आणि कॅन्टीनची पाहणी करून या जवानांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEknath Shindeएकनाथ शिंदे