शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदा गोत्यात

By admin | Updated: May 15, 2014 23:32 IST

राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने ३0 ऑगस्ट २0१३ रोजी तातडीचे परिपत्रक काढून जि.प.च्या अधिनस्त सर्व ग्रा. पं. मध्ये ३१ मार्च २0१४

मुदतवाढ संपली : अंमलबजावणीची प्रशासनापुढे अडचण

दिलीप दहेलकर - गडचिरोली

राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने ३0 ऑगस्ट २0१३ रोजी तातडीचे परिपत्रक काढून जि.प.च्या अधिनस्त सर्व ग्रा. पं. मध्ये ३१ मार्च २0१४ पर्यंत संपूर्ण संगणकीकरण व इंटरनेट (ब्रॉडबँड) सेवेची सुविधा करण्याचे सक्त निर्देश दिले. मात्र बीएसएनलच्यावतीने ज्या गावापर्यंत ब्रॉडबँड सेवेचे केबल वायर टाकण्यात आले आहे त्याच हद्दीपर्यंत ब्रॉडबँड सेवा देण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रत्येक ग्रा.पं.मध्ये इंटरनेट सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले असून यामुळे ई-निविदा प्रक्रिया गोत्यात सापडली आहे.

ग्रामपंचायतस्तरावरील विकास कामांमध्ये प्रामाणिकपणा व पारदर्शकता यावी, ग्रा.पं. ची कामे कमी दराने स्थानिक बेरोजगार कंत्राटदारांकडून व्हावी, या उद्देशाने जि.प., पं.स. नंतर ग्रामपंचायतीला ई-निविद प्रणाली आवश्यक केली आहे. नक्षलग्रस्त मागास जिल्ह्याच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ग्रा.पं.स्तरावरील ई-निविदा प्रणालीस सात महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढ संपली आहे. आता ग्रा.पं. ची सर्व नवीन कामे ई-निविदा प्रक्रियेतून करावयाची आहेत. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्ही असणे अत्यावश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी नाही. याशिवाय १७४ ग्रामपंचायतीमध्ये संगणक संचाची सुविधा नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे पूर्णत: संगणकीकरण झाले नसल्याने ई-निविदा प्रक्रिया कशी राबवायची, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. जि.प. प्रशासनाच्या आदेशावरून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी ग्रा. पं. मध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी देणे परवडत नसल्याचे बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांकडून ग्रामसेवकांना सांगितल्या जात आहे.