शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ई-पंचायतपासून अनेक सरपंच अनभिज्ञ!

By admin | Updated: October 6, 2014 23:12 IST

शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत,

गडचिरोली : शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ई-टेंडरींग आदी बाबी कळत नाही. त्यामुळे या मागील शासनाचा मूळ उद्देश यशस्वी होत नसल्याचे दिसून येत आहे.ई-पंचायतमुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा व गावांचा कारभार पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. यामुळे कामानाही काही प्रमाणात गती मिळाली आहे. परंतु अद्यापही ई-पंचायतचा अपेक्षीत असा निकाल पहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे, शासनाच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमध्ये याबाबत असलेले अज्ञान होय! याच कारणामुळे काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला असून नागरिकांना अपेक्षीत सहकार्य अद्यापही शासकीय यंत्रणेकडून प्राप्त होत नाही. ई-पंचायत या संकल्पनेची गावकरी तर सोडाच परंतु पदाधिकाऱ्यांनाही माहिती नाही. शासनाच्या ई-पंचायत संकल्पनेतून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५० टक्क्यापेक्ष्या अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते. राज्याच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतीमान व पारदर्शक व्हावा यासाठी ई-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये ही संकल्पना योग्यरित्या पोहोचली नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतमधील संगणक कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डेटा एन्ट्री आॅपरेटला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे. ग्रामपंचायतीमधील शिपाई व लिपीक या नवीन तंत्रज्ञान व कार्यप्रणालीपासून दूर असल्याचेच सर्वत्र दिसून येते. ग्रामपंचायतच्या निधीतून लाखो रूपये खर्चाचे ई-टेंडर कसे काढण्यात येते. हे आजही बहूतांश सरपंचाना माहित नाही. ही नवीन कार्यप्रमाणाली शिकून घेण्यासाठीही सरपंचाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच कर्मचाऱ्यांवर म्हणजेच एका ग्रामसेवकाच्या भरवशावर अनेक ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे सर्वत्र गोंधळच दिसून येतो. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. वेळेवर नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)