शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात डिझेल 20 रुपयांनी, तर तेल 70 रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील वर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे.

ठळक मुद्देगृहिणींचे बजेट बिघडले, राेजगार गेलेल्या कुटुंबांची पंचाईत

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या महामारीत महागाईचा भडका उडणे सुरूच आहे. वर्षभराच्या कालावधीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे, तर खाद्यतेलही प्रतिलिटर ७० रुपयांनी वाढले आहे. इतरही किरणा साहित्याचे दर वाढल्याने गरीब व सामान्य नागरिकांचे कंबरडे माेडले आहे. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील वर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात पेट्राेलचा दर ७० रुपये प्रतिलिटर हाेता. आता हा दर ९० रुपयांवर पाेहाेचला आहे. डिझेलचे दर वाढल्याने वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळेच किराणा वस्तूंच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. वाढत्या महागाईनुसार महिन्याचा बजेट तयार करताना महिला वर्गाची दमछाक उडत आहे.

काय म्हणतात गृहिणी

काेराेनाच्या या महामारीत खाद्यतेलासह किराणा साहित्याचेही दर वाढले आहेत. किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेल  दर दिवशी वापरली जाणारी वस्तू आहे. मात्र, याची किंमत वर्षभरात दुप्पट झाली आहे. त्यामुळे महिनाभरात किराणावर हाेणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. मनीषा नवघडे, गृहिणी

काेराेनामुळे राेजगार गेला आहे. सध्या घरी बसून कसेतरी दिवस काढणे सुरू आहे. घरात काहीही नसले तरी किराणा आवश्यक आहे. मात्र, किराणाचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी त्या खरेदी कराव्याच लागणार आहेत. दामिनी मेश्राम, गृहिणी

दरवर्षी काेणत्याही वस्तूंच्या किमती वाढणे अपेक्षित आहेच. मात्र, खाद्यतेलाची झालेली वाढ अनपेक्षित आहे. वर्षभरात खाद्यतेल दुपटीने वाढले आहे. आताही किमती वाढत आहेत. लीना चाैधरी, गृहिणी

 

टॅग्स :DieselडिझेलPetrolपेट्रोल