शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती काळात महिलेला मिळणार मदतनिसांची साथ

By admin | Updated: November 18, 2015 01:34 IST

गरोदर मातांच्या प्रसूती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी आणि प्रसूती सुरक्षित व आरोग्यदायी होण्यासाठी यापुढे आता प्रसूती दरम्यानच्या काळात....

शासनाचे परिपत्रक जिल्हा परिषदेला धडकले : प्रसूती प्रक्रियेत येणार पारदर्शकता; अंमलबजावणी झाली सुरू
गडचिरोली : गरोदर मातांच्या प्रसूती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी आणि प्रसूती सुरक्षित व आरोग्यदायी होण्यासाठी यापुढे आता प्रसूती दरम्यानच्या काळात मातेसोबत तिची मदतनिस उपस्थित राहण्यास अनुमती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापुढे मातेला थेट प्रसूतिगृहापर्यंत आपल्या जन्म मदतनिसाच्या उपस्थितीने मोठा मानसिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासकीय रुग्णालयात सध्या प्रसूतिगृहात (कक्षात) फक्त वैद्यकीय अधिकारी परिचारिका व सफाई कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला वा नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत नाही. ज्या काळात गरोदर महिलांना मानसिक आधाराची गरज असते. नेमक्या त्याच काळात ती माता प्रसूती कक्षात एकाकीपण अनुभवत असते. हे एकाकीपण दूर करण्यासाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार संबंधित गरोदर महिलेच्या एका जन्म मदतनिसाला गर्भधारणेपासून थेट प्रसूतीपर्यंत तिच्यासोबत राहता येणार आहे. यामुळे मातेला बाळंतपणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुटुंबाचा सहभाग मिळण्याची संधी तर उपलब्ध होईलच. शिवाय बाळंतपण व प्रसूती पश्चात कालावधीमध्ये मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे. गरोदरपणात मातेला मदत करण्यासाठी कोण असावा? यासाठी शासनाने एक निश्चित कार्यपद्धती निर्धारित केली आहे. यामध्ये मातेची आई, सासू, बहिण, जाऊ वा कुटुंबातील इतर स्त्री ज्यांना बाळंतपणाचा अनुभव आहे. अशा व्यक्तीची मदतनिस म्हणून निवड करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तीच्या निवडीनंतर तिचे नाव गरोदर महिलेच्या पुस्तकावर नोंद करावे आणि तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शिबिरही आयोजित करावे आदी सूचनांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित महिलेला यापुढे थेट प्रसूतीगृहापर्यंत प्रवेश देण्याची तरतुदही या योजनेत असल्याने प्रसूतीचा महत्वाच्या क्षणी ही महिला मातेला मानसिक आधार तर देईलच शिवाय प्रसूतीदरम्यानच्या प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
जागतिक संशोधनाअंती असे निदर्शनास आले की, गरोदर मातांना बाळंतपणादरम्यान सतत मानसिक आधार, प्रोत्साहन व सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक असते. मातेला असा धीर देण्यास बाळंतपणाचा कालावधी कमी होतो. वेदनाशामक औषधे वैद्यकीय पद्धतीची कमी आवश्यकता भासते. सिझेरीयन, शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी होते. प्रसूती पश्चात उदासीनतेचे प्रमाण कमी होते. स्तनपान लवकर सुरु होऊन बाळाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. या सर्व बाबी संशोधनात पुढे आल्याने जागतिक संशोधनाचा आधार घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने प्रसूतीच्या काळात मातेला मानसिक आधारासाठी तिच्या प्रसूतीपर्यंत एका मदतनिसांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यावर महाराष्ट्र शासनाने पहिले पाऊल टाकून शासन निर्णय कृतीत आणले व टप्प्याटप्प्याने प्रथम जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही हा निर्णय राबविण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)