शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कालव्याची प्रचंड दुरवस्था

By admin | Updated: July 20, 2015 01:44 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात रेगडी येथे एकमेव कन्नमवार जलाशय आहे. सध्या या जलाशयाची पाळ खचली असून मुख्य कालव्याची दूरवस्था झाली आहे.

रेगडी जलाशयाची व्यथा : दुरूस्तीकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष
ंघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात रेगडी येथे एकमेव कन्नमवार जलाशय आहे. सध्या या जलाशयाची पाळ खचली असून मुख्य कालव्याची दूरवस्था झाली आहे. मात्र रेगडी जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीकडे सिंचाई विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
रेगडी येथील कन्नमवार जलाशयातून घोट, चामोर्शी, भेंडाळा आदी परिसरातील गावातील शेत जमिनीला पाणी पुरवठा केला जातो. जलाशयाच्या मुख्य कालव्याद्वारे दरवर्षी धानपिकाला पाणी पुरवठा केला जातो. पाण्याच्या प्रवाहामुळे सदर मुख्य कालवा दरवर्षी खचत जातो. परिणामी या कालव्याची दूरवस्था झाली आहे. जलाशयाची पाळसुध्दा जागोजागी खचलेली आहे. त्यामुळे जलाशयाचा आकार वाढत आहे. दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्यास कन्नमवार जलाशयाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलाशयाची पाळ व मुख्य कालव्याच्या दुरूस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. मात्र शासन दुरूस्तीकरिता निधी उपलब्ध करून देत नसल्याने या कालव्याच्या दुरूस्तीचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी या भागातील सिंचन सुविधा प्रभावित होत आहे. (वार्ताहर)
रेगडी जलाशयात ८१.४५ टक्के जलसाठा
सद्य:स्थितीत रेगडी येथील कन्नमवार जलाशयात ८१.४५ टक्के जलसाठा असून ५५.०१ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. या जलाशयातील पाण्याची पातळी २२९.७२ मीटर आहे. १ जुलैपासून या ठिकाणी ५४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रेगडी येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती येथील सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.