शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे स्थायी मुख्याधिकारी मिळाले

By admin | Updated: August 22, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी

पाच रूजू होतील : नगर पंचायतींना अग्निशमन वाहन मिळणारअहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायतींना स्थायी मुख्याधिकारी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती. या मागणीची दखल घेत जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींना स्थायी मुख्याधिकारी देण्यात आले आहे. सध्या अहेरी येथे कुलदीप रामटेके, आरमोरी येथे सतीश चौधरी, चामोर्शी येथे अशौदा मोहम्मद, सिरोंचा येथे भारत नंदनवार, एटापल्ली येथे सुशिल कोकणी हे मुख्याधिकारी रूजू झाले आहेत. लवकरच अन्य पाच नगर पंचायतींना स्थायी मुख्याधिकारी मिळतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी अहेरी येथे लोकमतशी बोलताना दिली.नगर विकास खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असून त्यांच्याकडे पालकमंत्र्यांनी अनेकदा या प्रश्नावर पत्र व्यवहारही केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी पाच मुख्याधिकारी देण्याचे आदेश यंत्रणेला दिले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात केवळ देसाईगंज व गडचिरोेली या दोन नगर पालिकेतच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित दहा नगर पंचायतींनाही अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे ना. अम्ब्रीशराव आत्राम यांनी आग्रही मागणी केली. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन व वाढत्या आगीच्या घटनांचा पूर्ण आराखडा मांडल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागामार्फत अग्निशमनची १० वाहने गडचिरोली जिल्ह्याच्या १० नगर पंचायतींना मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.गडचिरोली जिल्हा मागास भाग असल्याने येथील नगर पंचायतींना विकास निधीही उपलब्ध करून द्यावा, यासाठी अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्याला मोठा निधी नगर पंचायतीकरिता उपलब्ध केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजन व विकास समितीतही याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून लवकरच शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी बुट व इतर साहित्यही जिल्ह्यात वितरित करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)