शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला धडक बसल्याने चारचाकी वाहन उलटले

By admin | Updated: May 1, 2017 02:13 IST

नागपूरवरून आरमोरी मार्गे गडचिरोलीकडे येत असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाचा पापुलर शॉप तुटल्याने चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसली.

चार गंभीर : आरमोरी मार्गावर साखरानजीकची घटना गडचिरोली : नागपूरवरून आरमोरी मार्गे गडचिरोलीकडे येत असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाचा पापुलर शॉप तुटल्याने चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसली. त्यानंतर सदर वाहन उलटल्याने वाहनातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावर साखरा पासून एक किमी अंतरावर घडली. नागपूरवरून गडचिरोलीकडे आरमोरी मार्गे चारचाकी वाहन भरधाव वेगात येत होते. दरम्यान या वाहनाची साखरानजीक येनाच्या झाडाला धडक बसली. त्यानंतर वाहन उलटले. घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रूग्णवाहिकेने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी भरती करण्यात आले. सदर अपघातातील वाहन प्रचंड क्षतिग्रस्त झाले. पोलिसांनी रात्री उशीरा हे वाहन बाजुला केले. रात्री उशीरापर्यंत या अपघातातील जखमींची नावे पोलिसांकडून कळू शकले नाही. अपघातस्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यापूर्वीही आरमोरी मार्गावर कठाणी नदीजवळ तसेच साखरा गावाच्या परिसरात अनेक अपघात घडले. गडचिरोली जिल्ह्यात वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून रस्त्याची रूंदी कायम आहे. पथदिव्यांअभावी आरमोरी मार्गावर अंधार राहत असल्याने रात्री सुध्दा या मार्गावर अपघात होत आहेत. गडचिरोली पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघाताची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(प्रतिनिधी) प्रथम आरमोरीची रूग्णवाहिका पोहोचली सदर अपघातातील जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्यासाठी आरमोरी व गडचिरोली रूग्णालयाला संपर्क साधण्यात आला. सर्वप्रथम आरमोरीची रूग्णवाहिका पोहोचली. त्यानंतर गडचिरोलीची रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.