नाली उपशात शिरले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:49+5:302021-06-21T04:23:49+5:30

संजय वडेट्टीवार यांनी सांगितले की वैयक्तिक वादातून घरासमोरील नालीचा उपसा करण्यात आला नाही. या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान ...

Drainage subdued politics | नाली उपशात शिरले राजकारण

नाली उपशात शिरले राजकारण

Next

संजय वडेट्टीवार यांनी सांगितले की वैयक्तिक वादातून घरासमोरील नालीचा उपसा करण्यात आला नाही. या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान असून शेकडो नागरिकांचे नेहमी आवागमन राहत असते. मात्र हेतूपुरस्सर आपल्यावर अन्याय करण्यात येत आहे. ग्रा. पं. चे उपसरपंच व सदस्य यांनी मोक्यावर पाहणी केली असता संजय वडेट्टीवार यांच्या घरासमोरील नाली २५ ते ३० मीटर नालीचा उपसा केला नाही, मात्र आता नाली उपसा करून सफाई करण्याचा प्रयत्न करतो असे उपसरपंच साईनाथ नेवारे यांनी सांगितले. पावसाळ्यात आपसी वादविवादातून नाली उपसा व सफाई न करणे ही बाब दुर्दैवी असून नाली सफाईअभावी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे असे प्रकारे घडू नये, ग्रामपंचायत प्रशासनाने उचित खबरदारी घ्यावी, असे ग्रामपंचायत सदस्य विलास उईके यांनी म्हटले आहे.

Web Title: Drainage subdued politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.