काेरचीत माेकाट कुत्र्यांना त्वचाराेगाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:18+5:302021-02-06T05:09:18+5:30

शहरातील मुख्य रस्ते बस स्थानक, बाजार चौक परिसर व शहरातील अनेक वॉर्डात मोकाट कुत्रे आणि जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. ...

Dog bites on carnivorous dogs | काेरचीत माेकाट कुत्र्यांना त्वचाराेगाचा विळखा

काेरचीत माेकाट कुत्र्यांना त्वचाराेगाचा विळखा

शहरातील मुख्य रस्ते बस स्थानक, बाजार चौक परिसर व शहरातील अनेक वॉर्डात मोकाट कुत्रे आणि जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील अनेकांकडे पाळीव कुत्रे आहेत. माेकाट कुत्र्यांपासून पाळीव कुत्रे व अन्य जनावरांना त्वचाराेगाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच येथील मोकाट कुत्रे रस्त्यावर धुमाकूळ घालतात. रस्त्यावरून धावणाऱ्या जीप, मोटारसायकल, टेम्पो, ट्रॅक्टरमुळे अनेक अपघात घडले आहेत. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय काही ठिकाणी माेकाट कुत्रे चावण्याचेही प्रमाण वाढले आहे. शालेय विद्यार्थी वृद्ध व्यक्ती आणि महिलांनाही मोकाट कुत्रे व जनावरांपासून धाेका आहे. रात्रीच्या सुमारास कुत्री भुंकत असल्याने लोकांची झोप उडत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने मोकाट कुत्री व त्वचाराेगाची लागण झालेल्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

असा पसरत आहे संसर्ग

काेरची शहरातील अनेक मोकाट कुत्र्यांना त्वचाराेगाची लागण झाली आहे. कुत्रे एकत्र असताना किंवा भांडताना त्यांचा एकमेकांशी संपर्क येताे. या संपर्कातूनच त्वचाराेगाची लागण हाेते. राेगग्रस्त कुत्र्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर कुत्र्यांनाही व पाळीव प्राण्यांना या राेगाची लागण हाेऊ शकते. त्वचाराेग झालेल्या कुत्र्यांपासून विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना ती असह्य हाेत असते.

Web Title: Dog bites on carnivorous dogs