शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासन अहवालापर्यंत बदल्या करू नये

By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर १२ मे मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बदल्यांसंदर्भात अहवाल

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर १२ मे मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बदल्यांसंदर्भात अहवाल शासनास पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला व जोपर्यंंत शासनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत कोणत्याही विभागाच्या बदल्या करू नयेत असा ठराव घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस जि. प. अध्यक्षा भाग्यo्री आत्राम, उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, महिला व बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, कृषी सभापती अतुल गण्यारपवार, बांधकाम सभापती छाया कुंभारे, जि. प. सदस्य विश्‍वास भोवते, अमोल मारकवार, अजय कंकडालवार, प्रशांत कुत्तरमारे, यशवंत धुडसे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या बदल्यांबाबत वादंग सुरू आहे. या बदल्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची चमू नुकतीच गडचिरोली जिल्हा परिषदेत येऊन गेली होती. यामुळे मंगळवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बदल्यांबाबत वादळी चर्चा झाली.

बदल्यासंदर्भात अहवाल शासनास पाठविण्याचा व जोपर्यंंत शासनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंंत कोणत्याही विभागाच्या बदल्या करण्यात येऊ नये, असा ठराव पारित करण्यात आला. नुकतेच जिमलगट्टा येथे रूग्णवाहिका न मिळाल्याने बैलबंडीत प्रसुती होऊन नवजात बालकाचा मृत्यू झाला होता असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका पुरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. कृषी विभागाचे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे जि. प. च्या कृषी विभागाची प्रतिमा मलीन असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी योजना राबवितांना गैरप्रकार करू नये अशी तंबी देण्यात आली. यावेळी जि.प.चे अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)