ओबीसी युवा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST2021-01-08T05:57:45+5:302021-01-08T05:57:45+5:30

गडचिराेली : राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ जिल्हा गडचिरोलीची जिल्हा कार्यकारिणी युवा जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे ...

District Executive of OBC Youth Federation announced | ओबीसी युवा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ओबीसी युवा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

गडचिराेली : राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ जिल्हा गडचिरोलीची जिल्हा कार्यकारिणी युवा जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाराव चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, सचिव प्रा. देवानंद कामडी यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्याध्यक्ष म्हणून सूरज डोईजड, उपाध्यक्ष अजय कुकुडकर, जिल्हा महासचिव राहुल भांडेकर, जिल्हा सचिव प्रमोद बोरकुटे यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये वैभव जुवारे, निशिकांत नैताम, बादल गडपायले, मयूर मुनघाटे, स्वप्नील घो यांचा समावेश आहे. गडचिरोली तालुकाध्यक्षपदी तुषार बोरकुटे, उपाध्यक्ष म्हणून अतुल सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात लवकरच राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाची तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, अशी माहिती युवा जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी दिली.

Web Title: District Executive of OBC Youth Federation announced