शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर ग्राहक आर्थिक साक्षरता जनजागृती

By admin | Updated: January 2, 2017 01:56 IST

ग्राहकांनी रोख व्यवहार टाळून कॅशलेस व्यवहाराकडे वळावे याकरिता वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता

बँकांचा पुढाकार : धुंडेशिवणी, देसाईगंज, मार्कंडादेव येथे कार्यक्रम; आर्थिक व्यवहारांवर दिली माहिती गडचिरोली : ग्राहकांनी रोख व्यवहार टाळून कॅशलेस व्यवहाराकडे वळावे याकरिता वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्डच्या सहकार्याने विविध बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ठिकठिकाणी वित्तीय साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. गडचिरोली - तालुक्यातील धुंडेशिवणी येथे डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एटीएम कार्डचा वापर, आधार कार्ड बँकांना संलग्नित करणे यासह विविध माहिती देण्यात आली. दरम्यान व्यवस्थापकांच्या हस्ते एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. देसाईगंज - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देसाईगंजच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. कोंढाळा, आमगाव, सावंगी, कोरेगाव येथे कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. कॅशलेस व्यवहार केल्यामुळे बँकेतील येरझारा थांबतात. तसेच मोबाईलवरून वीज देयक घरच्या घरी भरता येऊ शकतो. या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. शाखेचे निरिक्षक छगन कुंभारे यांनी येणारा काळ हा कॅशलेस व्यवहाराचा असून ग्रामीण भागातील नागरिक देखील या व्यवहारात मागे राहणार नाही, असे सांगितले. तसेच प्रत्येकाने कॅशलेस व्यवहाराचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला आमगावचे सरपंच योगेश नागतोडे, कोरेगावच्या सरपंच ममीता आळे, जि.प. सदस्य पल्लवी लाडे, निकम शाखा व्यवस्थापक चंदन बटवे उपस्थित होते. चामोर्शी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मार्र्कंडादेव व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमान डिजीटल वित्तीय साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन मार्र्कंडादेव येथे करण्यात आले. यावेळी एटीएम कार्डचे वितरणही करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच ललीता मरस्कोल्हे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गंगाधर कोंडुकवार, मृत्यूंजय गायकवाड, भारतीय आभारे, साळवे, भरडकर, हरिदास जीभकाटे, जेट्टीवार उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)