प्रशासकीय मान्यतेअभावी जिल्हा वार्षिक योजनेची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:27+5:302021-04-14T04:33:27+5:30

ग्रामपंचायतीना जनसुविधा पुरविणे, या योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२०-२१ या वर्षाकरिता ७ कोटी ७४ लाख ९० हजार रुपयांची ...

District Annual Plan work stalled due to lack of administrative approval | प्रशासकीय मान्यतेअभावी जिल्हा वार्षिक योजनेची कामे रखडली

प्रशासकीय मान्यतेअभावी जिल्हा वार्षिक योजनेची कामे रखडली

ग्रामपंचायतीना जनसुविधा पुरविणे, या योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२०-२१ या वर्षाकरिता ७ कोटी ७४ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीअंतर्गत दीडपट म्हणजे ११ कोटी ७४ लाख ९० हजार रुपयांची कामे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित करून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पाठविली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सदर कामाचे प्रस्ताव ३० जानेवारी २०२१ ला गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविले आहे. परंतु अजूनपर्यंत सदर कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश त्यांनी काढले नाही. त्यामुळे सदर विकास कामे अधांतरी पडली आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता केव्हा मिळणार? आणि विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर कामे दफ्तर दिरंगाईमुळे थांबली की अधिकारी व पदाधिकारी यांच्या भांडणामुळे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. असे असले तरी आपणच कामे सुचविली म्हणून अनेक कामांवर कार्यकर्ते व पदाधिकारी दावे करीत आहेत.

Web Title: District Annual Plan work stalled due to lack of administrative approval