१५० कर्मचाऱ्यांना माेफत हेल्मेट वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:23+5:302021-01-08T05:58:23+5:30

एटापल्ली : नॅशनल सेंटर फाॅर रूरल डेव्हलपमेंट नागपूर संस्थेंतर्गत एटापल्ली तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालविल्या जातात. सहा अनुदानित ...

Distribution of helmets to 150 employees | १५० कर्मचाऱ्यांना माेफत हेल्मेट वितरण

१५० कर्मचाऱ्यांना माेफत हेल्मेट वितरण

एटापल्ली : नॅशनल सेंटर फाॅर रूरल डेव्हलपमेंट नागपूर संस्थेंतर्गत एटापल्ली तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालविल्या जातात. सहा अनुदानित आश्रमशाळेच्या जवळपास १५० कर्मचाऱ्यांना संस्थाध्यक्ष शेखर टाेंगाे यांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप बुधवारी करण्यात आले.

या संस्थेंतर्गत एटापल्ली तालुक्यात तलवाडा, पंदेवाही, हेडरी, गेदा, काेटमी, बिनागुुंडा येथे विनाेबा प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक मुख्याध्यापक स्व. मनाेज नामनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेचे संचालक शेखर टाेंगाे यांच्या हस्ते हेल्मेट वितरित करण्यात आले. यावेळी नवर्षानिमित्त दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक राजेश देशपांडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित हाेते. संस्थेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी विविध प्रकारच्या भेटवस्तू वितरित करण्याचा उपक्रम राबविला जाताे.

Web Title: Distribution of helmets to 150 employees