शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकराची १० टक्के रक्कम आपसात वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक दर आहेत.

ठळक मुद्देरोकडवहीत नोंदच नाही । कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेचा नियमबाह्य ठराव

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुड : देसाईगंज उपविभागीय अभियंता इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेने सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून लॉकडाऊनमध्ये पाणी वापराची थकबाकी सक्तीने वसूल केली. मात्र वसूल केलेल्या पाणसाऱ्याची दहा टक्के रक्कम पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे जमा न करताच परस्पर खर्च केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.उपविभागीय अभियंता इटियाडोह सिंचन विभागाच्या नियंत्रणात कुरुड येथे गजानन पाणी वाटप संस्थेची निर्मिती झाली. शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक दर आहेत. परंतु अनेकदा नापिकीमुळे शेतकरी पाणसारा भरू शकत नाही. परिणाामी बरीच थकबाकी जमा होते. मागील पाच वर्षांपासून रबी हंगामासाठी इटियाडोह सिंचन प्रकल्पाकडून सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. यावर्षी रबी हंगामासाठी सिंचनाची सोय करुन देण्यात आली असली तरी लॉकडाऊनमुळे शेतकºयांच्या हाताला कामच नसल्याने ते अडचणीत आहेत. पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. या असहायतेचा फायदा घेत, गजानन पाणी वापर संस्थेने सक्तीने वसुली करण्याचा सपाटा लावला. वसूल केलेल्या रकमेची पावतीसुद्धा न देता त्याची नोंदसुद्धा रोकडवहीत घेतली नाही, असे सांगितले जात आहे. तथापि, पाणी वापर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इटियाडोह पाटबंधारे उपविभागीय अभियंत्यांना अंधारात ठेवून नियमबाह्य ठराव घेत कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करीत दहा टक्के रक्कम आपापसात परस्पर वाटप केली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करीत पाणी वापर समिती बरखास्त करुन त्यांच्यावरी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कुरुड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.समितीने ठराव घेतला हे खरे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून ९ लाख रुपये जमा केले आहेत. समितीची चांगली कामगिरी पाहून विरोधक आरोप करुन बदनाम करीत आहेत. आम्ही कोणाकडूनही सक्तीने वसुली केली नाही.- रवींद्र रणदिवे, सचिव,गजानन पाणी वापर संस्था कुरुडपाणी वापर समितीने वसूल केलेल्या कराची दहा टक्के रक्कम व्यक्तीश: खर्च करता येत नाही. त्यामुळे कुरुडच्या गजानन पाणी वापर संस्थेने घेतलेला ठराव रद्द होण्यास पात्र असून तो नामंजूर करण्यात आला आहे.- टी. के. मेंढे,प्रभारी उपविभागीय अभियंता, इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन सिंचन कार्यालय,देसाईगंज.

टॅग्स :water shortageपाणीकपात