गाव विकास आराखड्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:34+5:30

केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने आराखडा तयार करण्याची संकल्पना केंद्र शासनाने मांडली आहे.

Discussion on village development plan | गाव विकास आराखड्यावर चर्चा

गाव विकास आराखड्यावर चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हास्तरीय कार्यशाळा : ग्रामसेवक, सरपंच, ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र शासनाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा तयार करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरूवारी चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेला नवनिर्वाचित आ.डॉ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, समाजसेवक देवाजी तोफा, गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम आदी उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्हाभरातील ग्रामसेवक, ग्रामसभांचे अध्यक्ष, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
केंद्र शासनामार्फत वित्त आयोगातून प्रत्येक ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी खर्च करताना ग्रामसभेने त्या गावाची गरज लक्षात घेऊन प्राधान्य क्रम ठरवावा तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने आराखडा तयार करण्याची संकल्पना केंद्र शासनाने मांडली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने विकास आराखडा तयार करावा, या उद्देशाने नवनिर्वाचित आ. डॉ. होळी यांनी स्वत: पुढाकार घेऊन ग्रामसेवक व ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी केंद्र शासन गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतीबरोबरच गावातील नागरिक जोडधंदा करून स्वत:ची प्रगती साधतील, यासाठी गावकºयांना रोजगाराचे प्रशिक्षण दिले पाहिजे, गावासभोवतालच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ देऊ नका, भावी पिढ्यांसाठी सदर जमीन आवश्यक आहे. या जमिनीचे सर्वेक्षण करून हद्द कायम करा, असे मार्गदर्शन केले. समाजसेवक देवाजी तोफा यांनी ग्रामसभा दिवसा न घेता रात्री घ्यावी, जेणेकरून सर्व नागरिक ग्रामसभेला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतील, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन अमित माणुसमारे यांनी केले.

Web Title: Discussion on village development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.