शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: July 16, 2015 01:59 IST

येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे.

प्रचंड गर्दी : प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
अहेरी : येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे. आधार कार्ड केंद्र संचालकाकडून पिण्याचे पाणी व प्रवेशद्वारासमोर छताची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. शिवाय बचत बँक खाते, गॅस सिलिंडर कनेक्शनसाठी आधार कार्ड लिंकिंग करणे आवश्यक आहे. आधार कार्डचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत असल्याने नागरिक आधार कार्डाची नोंदणी करण्यासाठी अहेरीतील एकमेव आधार कार्ड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून गर्दी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
शासनाने आता सर्व शाळांची माहिती सरल या आॅनलाईन प्रणालीत संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड क्रमांक आवश्यक केल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन आधार कार्ड नोंदणीसाठी अहेरीच्या केंद्रावर गर्दी करीत आहेत. गर्दीमुळे शाळकरी मुलांना दिवसभर केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर उन्हात प्रतीक्षा करावी लागत असल्याने शाळकरी मुलांना प्रचंड त्रास होत आहे.
मोठ्या गावात नोंदणी केंद्र द्या
अहेरी तालुक्यात गावांची संख्या मोठी असून भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे. अहेरी शहर वगळून तालुक्यात इतर कोणत्याही गावात आधार कार्ड केंद्र नसल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर गर्दी करीत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पेरमिली, जिलमगट्टा, कमलापूर, बोरी, देवलमरी या मोठ्या गावांमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.