शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

फ्रिजवाल गाई घोटाळ्यातील ‘प्रोगे्रसिव्ह’च्या संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांना अटक झालेली नव्हती. त्यातील अरविंद श्रीहरी पराते, प्रकाश केशव तिजारे आणि श्याम श्रीहरी पराते यांना आता अटक झाली.

ठळक मुद्देचार दिवसाचा पीसीआर : परस्पर विकलेल्या ५३ गाई जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांच्या नावाने पुण्यातील लष्कराच्या कॅम्पमधून आणलेल्या महागड्या दुधाळू गायी शेतकऱ्यांना न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या प्रोग्रेसिव्ह कंपनीच्या ३ संचालकांना अखेर अटक करण्यात आली. ‘लोकमत’मुळे चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणी जानेवारी महिन्यात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तीनही आरोपींना ४ दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.जिल्हा प्रशासन आणि आ.कृष्णा गजबे यांनी ‘लोकमत’च्या मालिकेची गंभीर दखल घेत सर्वांची फसवणूक करणाऱ्या त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आरमोरीतील अमोल मारकवार, सुभाष सपाटे या जागरूक नागरिकांनी शेतकऱ्यांना जागृत केल्याने काही शेतकऱ्यांना गायी मिळाल्या.दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांना अटक झालेली नव्हती. त्यातील अरविंद श्रीहरी पराते, प्रकाश केशव तिजारे आणि श्याम श्रीहरी पराते यांना आता अटक झाली. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांचा पीसीआर दिला.ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पो.अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, एसडीपीओ मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आरमोरी ठाण्याचे निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी व त्यांच्या चमुने केली. या प्रकरणात अजून काही मुद्दे समोर येणार आहेत.पोलिसांना महसूल अधिकाऱ्याची मदतया प्रकरणी गडचिरोली पोलीस दलाच्या तपास पथकाने सखोल चौकशी केली असता आरोपींनी काही गायींची परस्पर विल्हेवाट लावण्याचे दिसून आले. त्यावरून फ्रिजवाल गायी जप्त करण्यासाठी पोलीस दलाला महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांची विविध पथके तयार करून मदत करण्यात आली. आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील आरमोरी, अंतरजी, डोंगरगाव, पळसगाव, शिवणी, करपळा, कुरूड, कोंढाळा येते छापे टाकून ५३ गायी जप्त करण्यात आल्या.‘लोकमत’ने उघडकीस आणलेले प्रकरणशेतकऱ्यांची कंपनी असल्याचे दाखवत पुण्यावरून आणलेल्या त्या गायी पशुसंवर्धन आयुक्तांपासून तर स्थानिक अधिकाºयांपर्यंत सर्वांची दिशाभूल करत स्वत:च लाटण्याचा प्रोग्रेसिव्ह कंपनीचा डाव ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेने अयशस्वी झाला होता. पण प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना लिमीटेड या कंपनीने त्या गायींपैकी अनेक गायी परस्पर काही लोकांना विकून त्यांची विल्हेवाट लावली. त्यानंतर कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :cowगाय