शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी

By admin | Updated: July 14, 2015 02:05 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या सत्रापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या सत्रापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व वसतिगृहांकरिता विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार गडचिरोली प्रकल्पातील मुला-मुलींचे मिळून एकूण २१ वसतिगृहांसाठी इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालानंतर जून महिन्यापासून आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचा डाटा आदिवासी विकास विभागाच्या ई-ट्रायबल या वेबसाईडवर अपलोड होत नसल्याने या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत आदिवासी मुलींचे आठ व मुलांचे १३ असे एकूण २१ शासकीय वसतिृह आहेत. यामध्ये गडचिरोलीत मुलांचे दोन, मुलींचा एक तसेच चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा, आरमोरी, घोट, मोहली, कोरची, आष्टी, मालेवाडा, चातगाव आदी ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहेत. तर चामोर्शी, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, आष्टी व कोरची या ठिकाणी मुलींचे वसतिगृह आहेत. या २१ शासकीय वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता एकूण २ हजार १८५ आहे. मात्र काही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असल्याने यात कमी विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा करण्यात येते. त्यामुळे २१ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश क्षमता एकूण २ हजार १५५ आहे. या सर्व वसतिगृहांमध्ये दोन लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता आठवी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या मुला-मुलींना प्रवेश दिल्या जातो.
यंदा २०१५-१६ सत्रापासून वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी नवे विद्यार्थी तालुकाच्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा असलेल्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज भरत आहेत. याशिवाय शहरातील वसतिगृहांमध्ये एक कम्प्युटर इंटरनेट सुविधेसह ठेवण्यात आले आहे. आॅनलाईन प्रवेश अर्जात संबंधित विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक, विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती, आर्थिक उत्पन्न तसेच भारत सरकार अथवा सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाबाबतचे पासवर्ड व आयडी नोंदविणे आवश्यक आहे. मात्र इयत्ता अकरावी व इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीबाबतची माहिती ईट्रायबल वेबसाईडवर अपलोड होत नसल्याने या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०१५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र आॅनलाईन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

वसतिगृहनिहाय गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
आदिवासी विकास विभागाने यंदाच्या सत्रापासून सर्व शासकीय वसतिगृहासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहे. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहासाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

वसतिगृहनिहाय गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
आदिवासी विकास विभागाने यंदाच्या सत्रापासून सर्व शासकीय वसतिगृहासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहे. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहासाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

इयत्ता आठवी ते दहावीच्या ४२१ विद्यार्थ्यांचे आॅफलाईन प्रवेश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत आदिवासी मुला-मुलींच्या २१ शासकीय वसतिगृहात इयत्ता आठवी ते दहावीतील प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे. इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण ४२१ विद्यार्थ्यांचे वसतिगृहात आॅफलाईन प्रवेश झाले आहे. यामध्ये जवळपास ५० विद्यार्थी मागील वर्षीचे प्रवेशीत विद्यार्थी आहेत.