शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी आगारातून आणले जात आहे डिझेल

By admin | Updated: July 15, 2015 01:39 IST

स्थानिक आगारातील डिझेलपंप मागील चार दिवसांपासून बंद पडला असल्याने ब्रह्मपुरी आगारातून डिझेल आणून आगारातील बसफेऱ्या चालविल्या जात आहेत.

अनेक शेड्यूल रद्द : बसफेऱ्यांना होत आहे विलंब; प्रवाशांचे बेहाल; पंप लावण्याच्या कामास सुरूवात
गडचिरोली : स्थानिक आगारातील डिझेलपंप मागील चार दिवसांपासून बंद पडला असल्याने ब्रह्मपुरी आगारातून डिझेल आणून आगारातील बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. तरीही डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे एसटीचे हजारो रूपयांचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांचेही हाल सुरू आहेत.
गडचिरोली आगारात असलेले दोनही डिझेल पंप बंद पडल्याने मागील चार दिवसांपासून गडचिरोली आगारात डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. शनिवार ते सोमवार पर्यंत इतर आगारातून येणाऱ्या बसेसच्या डिझेल टँक फुल्ल भरून आणल्या जात होत्या. व सदर बसेस गडचिरोली आगारात आल्यानंतर त्यातील डिझेल इतर बसेसमध्ये टाकले जात होते.
मात्र यासाठी बराच कालावधी लागत असल्याने अनेक बसेस उशीरा सुटत होत्या तर काही बसेसचे शेड्युलही रद्द करावे लागले. प्रवाशांची ओरड सुरू झाली होती. ही बाब लक्षात घेवून गडचिरोली आगाराने मंगळवारी रात्री १ हजार २०० लिटर डिझेल बोलाविले आहे. डिझेल पंप सुरू होईपर्यंत याच आगारातूून डिझेल मागविले जाणार असल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.
गडचिरोली आगारात एकुण १०५ बसेस आहेत. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या आगारातून अनेक लांबपल्याच्या बसेस सोडल्या जातात. त्याचबरोबर ग्रामीण भागातही दरदिवशी शेकडो फेऱ्या चालविल्या जातात. त्यामुळे एवढे डिझेल पुरेसे नाही.
परिणामी डिझेलचा तुटवडाच जाणवणार आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे सोमवारचे अनेक शेड्युल रद्द करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
पंप सुरू होण्यास पाच दिवस लागणार
दोनही पंप बिघडल्यानंतर एसटी विभागाने रविवारी डिझेल पंप उपलब्ध करून दिला. सदर पंप बसविण्याच्या कामाला मंगळवारी सुरूवात झाली. पाईप लाईनचे खोदकाम करणे, नवीन मशीन बसविणे यासाठी पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याची शक्यता लोकमतशी बोलतांना एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तेवढे दिवस उसणेवारीच्या डिझेलवरच बसेस चालवाव्या लागणार आहेत.