शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बस स्थानकांवर ‘हिरकणीं’ची कुचंबना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

कुचंबना होऊ नये म्हणून सात वर्षांपूर्वी ‘हिरकणी कक्षा’ची सुविधा निर्माण करण्यात आली. पण आजच्या स्थितीत हे कक्ष नावापुरतेच शिल्लक ...

कुचंबना होऊ नये म्हणून सात वर्षांपूर्वी ‘हिरकणी कक्षा’ची सुविधा निर्माण करण्यात आली. पण आजच्या स्थितीत हे कक्ष नावापुरतेच शिल्लक आहेत. प्रत्यक्षात काही ठिकाणी ते कुलूपबंद आहेत तर काही ठिकाणी हिरकणी कक्षासाठी जागाच नसल्याची सत्य परिस्थिती ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली. यामुळे बाळाला दूध पाजताना अनेक मातांची कुचंबना होत आहे.

गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. पण या बस स्थानकावरील हिरकणी कक्ष अनेक दिवसांपासून बंद आहे. त्या कक्षाच्या दाराचा पडदा सरकवून आत डोकावले असता आतमध्ये अडगळीतील सामान ठेवलेले आढळले. त्यावरून अनेक महिन्यांपासून तो कक्ष उघडल्या गेला नसल्याचे स्पष्ट होते.

आरमोरी बस स्थानकावरील हिरकणी कक्षातही अडगळीतील सामान होते. तिथेच बसण्यासाठी एक खुर्ची ठेवलेली होती. अहेरी, सिरोंचा बस स्थानकात तर हिरकणी कक्षच गायब असल्याचे दिसून आले. अपुऱ्या जागेमुळे तिथे हिरकणी कक्षाची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. आता ज्या ठिकाणी बस स्थानक इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी स्वतंत्र हिरकणी कक्ष राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुरूपयोग टाळण्यासाठी कुलूपबंद

हिरकणी कक्षात कोणीही जाऊन बसू नये आणि त्या कक्षाचा दुरूपयोग होऊ नये म्हणून त्याला कुलूप लावून ठेवले जाते. अनेकदा भिकारीसुद्धा तिथे जाऊन बसत होते. आता ते बंद दिसत असले तरी त्याची चावी चौकशी कक्षात असते. स्तनपान करण्यासाठी कोणी मागणी केल्यास कक्ष उघडून दिला जातो.

- अशोक वाडीभस्मे

विभाग नियंत्रक, गडचिरोली

कक्षाची माहितीच नाही

बाळाला पाजण्यासाठी हिरकणी कक्षात बसण्याची व्यवस्था आहे याची आम्हाला माहितीच नाही. कोणी त्याबद्दल सांगितलेही नाही. तान्हे मूल असणाऱ्या महिलांसाठी अशी वेगळी खोली असल्यास त्यांना इतरांसमोर पाजण्याची वेळ येणार नाही. तशी सुविधा नेहमीसाठी असावी.

- प्रज्ञा अनंत रायपुरे

प्रवासी महिला

हिरकणी कक्ष तयार करण्यामागील हेतू

एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेक महिलाही आपल्या चिमुकल्या बाळांना घेऊन असतात. बसची वाट पाहताना भूक लागलेल्या बाळाला अंगावरचे दूध पाजावे लागते. अशावेळी इतर प्र‌वाशांच्या नजरा चुकवण्यासाठी पदर झाकताना त्या मातेला मोठी कुचंबना सहन करावी लागते. हे टाळण्यासाठीच बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उभारले होते. बाळाला दूध पाजताना त्या कक्षात जायचे आणि पाजून झाल्यानंतर पुन्हा फलाटावरील बेंचवर येऊन बसावे अशी ती व्यवस्था होती. त्या कक्षात लाईट, पंखा अशा सुविधांही दिल्या होत्या.