शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उपवन विभागांची निर्मिती होणार

By admin | Updated: September 29, 2014 23:06 IST

प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे.

गडचिरोली : प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाच्या अंतर्गत गडचिरोली, देसाईगंज, आलापल्ली, भामरागड व सिरोंचा हे पाच वन विभाग आहेत. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यात तीन ते चार जिल्ह्यांचा मिळून एक वनवृत्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. व एका जिल्ह्यामध्ये एकच वनविभाग आहे. भौगोलिक क्षेत्र मोठे राहत असल्याने सदर जंगालाची पाहणी करणे, अशक्य होऊन बसत होते. त्याचबरोबर प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून उपवनविभाग निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. यानुसार गडचिरोली वनविभागात धानोरा व गडचिरोली हे दोन उपविभाग निर्माण केले जाणार आहेत. देसाईगंज वन विभागात देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तीन ठिकाणी उपवनविभागाचे कार्यालय स्थापन केले जाणार आहे. आलापल्ली वन विभागात घोट, आलापल्ली, भामरागड वन विभागात एटापल्ली, भामरागड तर सिरोंचा वनविभागात जिमलगट्टा, कमलापूर, सिरोंचा या ठिकाणी उपवन विभागांची निर्मिती केली जाणार आहे. सहायक वनसंरक्षक हे वनविभागातील गट ‘अ’ चे पद असून वनांचे रक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक वनसंरक्षकांवर राहते. त्यासाठी त्यांच्या दिमतीला वन कर्मचाऱ्यांचा ताफा राहतो. मात्र त्यांना कार्यालय प्रमुखाचा दर्जा राहत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. सहायक वनसंरक्षकांना त्यांचे कर्तव्य अधिक प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी त्यांना कार्यालय प्रमुख म्हणून दर्जा दिल्या जाणार आहे. महसूल विभागाप्रमाणेच वन विभागातही उपविभागांची निर्मिती करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयांना वनविभाऐवजी उपवन विभाग कार्यालयाकडे कामाचा अहवाल द्यावा लागणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्यास फार मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे वन विभागाचे प्रशासन गतिमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण जास्त असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक आहे. हा भार उचलण्यासाठी उपवन विभागातील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभणार आहे. (नगर प्रतिनिधी)