शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तालुकाही अखेर कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

देसाईगंजमध्ये आता पर्यंत ४००७ नागरिक बाहेरून प्रवास करून आले आहेत. त्यापैकी १४५६ प्रवाशी अजुनही आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली आहेत. एकुण तीन संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये त्यांना ठेवले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री उशिरा कॉरमेल अकॉडमी आमगांव या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील एका २६ वर्षीय युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त आला.

ठळक मुद्देपहिला रुग्ण आढळला : स्थानिक आरोग्य यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/मुलचेरा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त तालुका असलेल्या देसाईगंज या एकमेव तालुक्यातही अखेर कोरोनाचे आगमन झाले आहे. मुंबई येथून आलेल्या आणि स्थानिक कारमेल अकादमी या संस्थेच्या विलगीकरण केंद्रात असलेल्या प्रवाशाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल मंगळवारच्या रात्री प्राप्त झाला.
देसाईगंजमध्ये आता पर्यंत ४००७ नागरिक बाहेरून प्रवास करून आले आहेत. त्यापैकी १४५६ प्रवाशी अजुनही आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली आहेत. एकुण तीन संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये त्यांना ठेवले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री उशिरा कॉरमेल अकॉडमी आमगांव या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील एका २६ वर्षीय युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त आला. तो ६ जूनला मुंबईवरून आला होता.
मुंबईच्या वाशी येथून ६ जूनला एकूण २९ प्रवासी खाजगी बसने देसाईगंज येथे आले होते. त्यातील १० जणांना देसाईगंजमध्ये तर १७ जणांना धानोरा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. उर्वरीत २ प्रवाशी गोंदिया जिल्ह्यातील होते.

नियमांची अंमलबजावणी नाहीच
देसाईगंज तालुका संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट लॉकडाऊनपासून अनलॉक टप्पा ३ सुरु होईपर्यंत ग्रीन झोनमध्येच होता. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसार लॉकडाऊनची अंमलबजावनी काटेकोरपणे होणे अनिवार्य होते. पण देसाईगंजच्या बाजारपेठेत सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मोकळीक दिली असताना बाजारपेठेत मोठी गर्दी उसळत आहे. तोंडाला मास्क बांधने, सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत अनुपालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी टाळणे या नियमांचे पालन होताना दिसत नाही.

संपर्कातील लोकांचा शोध सुरू
देसाईगंजच्या विलगीकरण केंद्रात ५७ लोक आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या कोरोना रु ग्णाÞच्या विलगीकरण केंद्रातील इतर लोकांपैकी तो रुग्ण कोणाकोणाशी संपर्कात आला, त्याला कोण-कोण भेटायला गेले होते? घरु न जेवनाचा डबा नेऊन देणाऱ्याचा संपर्क आला काय? याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन त्या लोकांची शोधाशोध सुरु आहे.

‘त्या’ महिला रुग्णाने लपविली माहिती
मुलचेरा तालुक्यात तीन महिला मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्या. त्यापैकी एका पॉझिटीव्ह महिला रुग्णाने कोलकाता येथून आल्याची माहिती प्रशासनापासून माहिती लपवून चंद्रपूर येथून आल्याचे सांगितले. ही बाब नंतर उजेडात आली. सहायक जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या पथकाने तालुक्यात भेट देऊन त्यांच्या तीनही पॉझिटिव्ह महिलांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहीम राबविली. खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या