शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज गुटखा विक्रीचे केंद्र

By admin | Updated: January 10, 2015 01:18 IST

शहरात अवैध गुटख्याचा व्यवसाय चांगला फोफावला आहे. व्यवसायातील लाभ पाहता नवीन व्यावसायिकांनी या व्यवसायात पाय ठेवला आहे.

महेंद्र चचाणे देसाईगंजशहरात अवैध गुटख्याचा व्यवसाय चांगला फोफावला आहे. व्यवसायातील लाभ पाहता नवीन व्यावसायिकांनी या व्यवसायात पाय ठेवला आहे. पोलीस प्रशासनासोबत इतर शासकीय कार्यालयांना ‘बांधण्याकरिता’ शहरातील सर्व गुटखा व्यवसायी एकवटले आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून व्यवसायात लाखोंचा मलिदा लादण्यासाठी विविध मार्गाचा अवलंबिला आहे.गुटखा किंवा सुगंधीत तंबाखुच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्याच्या समस्येने उग्ररूप घेऊ नये म्हणून राज्य शासनाने २ आॅक्टोबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीवर बंदी आणली आहे. बंदी आणल्या बरोबर व्यापाऱ्यांनी लगतच्या राज्यातून गुटख्याची साठवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळविणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत लगतच्या संपूर्ण जिल्ह्यात शहरातून गुटख्याचा वापर होत आहे. या व्यापाराबद्दल पोलिसांना पूर्ण जाणीव आहे. मात्र पोलिसांनी कोणत्याही मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. सप्टेंबर महिन्यात शहरात २ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. मात्र त्यावेळी जिल्हा पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांच्यातील सामंजस्याच्या अभावामुळे गुटखा तस्करावर कठोर कारवाई केल्या गेलेली नाही. त्यामुळे शहरातील गुटखा व्यापारी ‘पुलिस मेरे जेब मे’ म्हणत या व्यापारात पाय पसरवित चालले आहेत. मात्र पोलीस या तस्कराकडे कानाडोळा करीत मौन बाळगुण आहे. गुटखा तस्करीबाबत ‘लोकमत’ने १४ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुटखा व्यावसायिकांवर पाश आवळला होता. मात्र नंतर परिस्थिती जैसे थे झाली. ‘लोकमत’ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात प्रत्येक दिवशी १८ लाखाचा गुटखा उतरतो व छुप्या पध्दतीने हा सारा व्यवसाय चालविला जातो. आपसातील मतभेद विसरून व्यवसायातील अडसर दूर करण्याकरीता शहरातील सर्व गुटखा व्यावसायीक एकवटले असून त्यांनी हा अवैध धंदा वाढविण्याचा निर्धार केला आहे. छत्तीसगडमधून मालाची आयातवडसा (देसाईगंज) गाव रेल्वे मार्गावर असल्याने गोंदिया जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर माल येथे येतो. सध्या शहरात येत असलेला संपूर्ण सुंगधीत तंबाखू माल लगतच्या छत्तीसगडमधून येत आहे. राज्याची सीमा अतिशय संवेदनशील आहे. त्याचा फायदा गुटखा व्यावसायातील माल शहरात उतरविण्याकरिता होत आहे. गुटखा विक्री : कॅन्फेन्शनरीच्या व्यवसायाचा आधारगुटख्याकरिता लागणारी सुपारी, पन्नी तसेच इतर पान साहित्याचा व्यवसाय करण्याकरिता दुकानात सुगंधीत तंबाखू ठेवणे आवश्यक आहे. तेव्हाच व्यावसायिकाचा इतर माल विकला जातो. त्यामुळे अवैध व्यावसायिकांनी कन्फेन्शनरीच्या व्यवसायातून सुगंधीत तंबाखूचा व्यवसाय चालविला आहे.