आकापुरात रोवणी यंत्राचे प्रात्यक्षिक

By Admin | Updated: July 7, 2015 01:23 IST2015-07-07T01:23:52+5:302015-07-07T01:23:52+5:30

तालुक्यातील आकापूर येथे कृषी सप्ताहानिमित्त कृषी विभागाच्या वतीने भात रोवणी यंत्राचे प्रात्यक्षिक रविवारी करून दाखविण्यात आले.

Demonstration of the planting machinery in Akapur | आकापुरात रोवणी यंत्राचे प्रात्यक्षिक

आकापुरात रोवणी यंत्राचे प्रात्यक्षिक

वापराबाबत केले मार्गदर्शन : पॅक हाऊसचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
आरमोरी : तालुक्यातील आकापूर येथे कृषी सप्ताहानिमित्त कृषी विभागाच्या वतीने भात रोवणी यंत्राचे प्रात्यक्षिक रविवारी करून दाखविण्यात आले.
यावेळी कृषी आयुक्तालयाचे संचालक जयंतराव देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे उपसंचालक विजय कोळेकर, हिरडकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. जे. गोथे, विजय अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत आकापूर येथे पॅक हाऊस निर्माण करण्यात आले आहे. या पॅक हाऊसचे उद्घाटन जयंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी पर्यवेक्षक कोहळे यांनी शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया व माती परीक्षण याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाअंतर्गत योजनांची माहिती तसेच एम किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांकाची नोंदणी आदी बाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व आभार तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे यांनी केले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. रहांगडाले यांनी केले. कार्यक्रमाला पवन माधवशेट्टीवार, हर्षल देशमुख उपस्थित होते. आकापूर परिसरात पहिल्यांदाच भात पिकाची रोवणी यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय होता. त्यामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यंत्राचा वापर कशा पद्धतीने करावा, याबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstration of the planting machinery in Akapur