शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 01:50 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार १७१ अंगणवाड्या असून त्यापैकी ३६ अंगणवाडी सेविका व ५५ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यात एकूण १ हजार १७१ अंगणवाड्या असून त्यापैकी ३६ अंगणवाडी सेविका व ५५ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. या अंगणवाड्यांचा कारभार गावातील दुसऱ्या अंगणवाडीच्या कर्मचाऱ्याकडे किंवा दुसऱ्या गावातील अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे सोपविला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने सदर पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणून अंगणवाडीला संबोधल्या जाते. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात व पोषण करण्याची जबाबदारीसुध्दा अंगणवाडीवर आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार १७१ अंगणवाड्या व ५१८ मिनी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस ही दोन पदे मंजूर आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही दोन्ही पदे आवश्यक आहेत. मात्र इतर इतर विभागांप्रमाणेच बालकल्याण विभागालाही रिक्त पदांचे ग्रहण कायम आहे. अंगणवाडी मदतनिसांचे ५५, अंगणवाडी सेविकांचे ३६ व मिनी अंगणवाडी सेविकेचे ४५ पदे रिक्त आहेत. सदर पदे तत्काळ भरण्यात यावी, याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत ही पदे भरण्यात आली नाही. परिणामी लहान बालकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)