शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोडलवाही-पेंढरी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या ...

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्के खावे लागत आहेत. महामंडळाची बसही या मार्गावरून कशीबशी धावत आहे. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली नाही. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. सदर मार्ग रहदारीचा असून, येथून दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली. यापूर्वी परिसरातील काही गावांमध्ये तेंदू हंगामात आवागमन वाढले होते. आधीच हाल झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.