शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९ लाखांचे कर्ज माफ

By admin | Updated: December 23, 2015 01:42 IST

शेती लागवडीच्या खर्चासाठी खासगी सावकारांकडे सोन्याचे दागिणे तारण ठेवून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य असल्याचे दिसून आले.

सरसकट व्याज माफ : सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्ततादेसाईगंज : शेती लागवडीच्या खर्चासाठी खासगी सावकारांकडे सोन्याचे दागिणे तारण ठेवून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाने देसाईगंज तालुक्यातील तब्बल १ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९ लाख ६९ हजार रूपयांचे सावकारी कर्ज व्याजासहित माफ केले आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सावकारांच्या कर्जरूपी पाशातून मुक्तता झाली आहे. देसाईगंज येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने सावकारी व्यवसायाकरिता २५ सावकारांना रितसर परवाना देण्यात आला आहे. यापैकी ११ सावकारांनी व्यवसाय सुरू केला नाही. तर १४ सावकारांच्या २ हजार १९१ खातेदारांचे प्रस्ताव तालुका व उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आले. या खातेदारांच्या कर्जाची रक्कम १२९.३९ लाख रूपये आहे. सदर सर्व प्रकरण संबंधित तलाठ्यांकडे सादर केली असता, १ हजार ३०१ लाभधारक शेतकऱ्यांचे ९३.३७ व ३८७ खातेदारांवर २१.०७ लक्ष रूपयांचे कर्ज होते. मात्र ३८७ कर्ज घेतलेले खातेदार शेतकरी नसल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ५०३ खातेदारांचा ठावठिकाणाच लागला नाही. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने या खातेदारांचे कर्ज माफ केले नाही. पात्र झालेल्या १ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९.६९ लाख रूपयांचे व्याजासहित सावकारी कर्ज माफ करण्यात आले आहे. (वार्ताहर)